पिंपरी-चिंचवड

वडगावात शुक्रवारी विजय दिन सोहळ्याचे आयोजन

CD

वडगाव मावळ, ता.१३ : महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने शुक्रवारी (ता.१६) विजयदिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. रवींद्र यादव यांनी दिली.
श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्याने १६ जानेवारी १७७९ मध्ये येथे इंग्रजी सैन्यावर निर्णायक विजय मिळवला होता. या विजयाच्या स्मृती जागविण्याच्या उद्देशाने मागील २२ वर्षांपासून विजय दिन सोहळा साजरा केला जातो. या प्रसंगी सकाळी दहा वाजता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांच्या हस्ते विविध किल्ल्यावरील जल कुंभामधून आणलेल्या पाण्याने महादजी शिंदे यांच्या पुतळ्याला अभिषेक, सायंकाळी सात वाजता व्याख्याते सचिन ढोबळे यांचे शिवशंभू चरित्र या विषयावर व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी वडगावच्या नगराध्यक्षा अबोली ढोरे असतील. तहसीलदार विक्रम देशमुख, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, ज्येष्ठ इतिहास तज्ञ पांडुरंग बलकवडे, मयूर ढोरे, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, गुलाबराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, मोडी लिपी अभ्यासक अशोक सरपाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेतील ब्राँझ पदक विजेती खेळाडू ऋचिका ढोरे हिला ‘महादजी शिंदे क्रीडा पुरस्कार’ तर सफर ३६१ किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठानला ‘महादजी शिंदे दुर्गवीर पुरस्कार देऊन’ गौरविण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते दीपोत्सवाने सोहळ्याची सांगता होईल. सर्व इतिहास प्रेमींनी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन यादव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Election 2026 : उर्वरित २० जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचं काय? कधी होणार घोषणा? वाचा...

Voter List: नवीन मतदारांसाठी महत्त्वाची माहिती! मतदार यादीत नाव आहे की नाही? अशा प्रकारे करा खात्री

Crime News : सटाण्यात 'देहविक्रय' करणाऱ्या टोळीला बेड्या; पोलिसांनी १६ हजारांच्या मुद्देमालासह तिघांना पकडले

Alandi Municipal Council : 'बुके ऐवजी बुक' देऊन नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत; आळंदी पालिकेत भाजपचे निर्विवाद वर्चस्व!

Pune News : चतुःश्रृंगी मंदिरासमोर बेघरांचा ठिय्या; शेकोट्यांमुळे प्रदूषणात वाढ आणि भाविकांची सुरक्षितता धोक्यात!

SCROLL FOR NEXT