पिंपरी-चिंचवड

उमेदवारी अर्ज लवकर दाखल करा ः प्रांताधिकारी नवले

CD

वडगाव मावळ, ता.१५ : ‘‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर उमेदवारी अर्ज दाखल केल्यास ते तपासण्याची व्यवस्था केली जाईल. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया तसेच आचारसंहितेची माहिती देण्यासाठी नवले यांनी गुरुवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली. त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार विक्रम देशमुख, नायब तहसीलदार गणेश तळेकर, लोणावळ्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पंचायत समितीच्या अधिकारी कविता पाटील, संताजी जाधव आदींसह भाजपचे माजी तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, अभिमन्यू शिंदे, दत्तात्रेय माळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रामदास वाडेकर, काँग्रेसचे लीगल सेल अध्यक्ष ॲड.खंडुजी तिकोणे, विशाल वाळुंज, शिवसेनेचे युवक अध्यक्ष विशाल हुलावळे, संघटक मदन शेडगे, बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे युवक अध्यक्ष संदीप कदम आदी उपस्थित होते.
नवले म्हणाले, ‘‘तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शुक्रवार (ता.१६) पासून सुरुवात होणार आहे. २१ जानेवारी ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी अखेरच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल केल्यास ते व्यवस्थित तपासले जातील. काही त्रुटी राहिल्या असल्यास त्यांना सांगता येतील. शेवटच्या दिवशी जास्त संख्येने अर्ज येत असल्याने त्या दिवशी अर्ज तपासण्यासाठी आवश्यक वेळ मिळणार नाही.’’

प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना...
- एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करता येतील.
- प्रत्येक अर्जाला वेगळा सूचक असावा.
- तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था.
- अर्ज दाखल करताना उमेदवार व त्याच्याबरोबर इतर चार जणांना प्रवेश.
- उमेदवारी अर्जासोबत शौचालय वापरत असल्याचे, अपत्ये, चारित्र्याबाबतचे प्रमाणपत्र अशी सर्व कागदपत्रे देणे आवश्यक.
- राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र अथवा जात पडताळणी अर्जासोबत जोडणे आवश्यक.
- शपथपत्रे ही स्टँपपेपरवर सादर करायची गरज नाही. नोटरी केलेली चालू शकतील.
- पक्षाचा एबी फॉर्म २१ तारखेला तीन वाजेपर्यंत सादर करता येईल.
- उमेदवारांना आवश्यक ते सर्व परवाने देण्यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकीची व्यवस्था.
- प्रत्येक पानासाठी दोन रुपये याप्रमाणे शुल्क आकारून मतदार याद्या उपलब्ध केल्या जातील.

किती आहे खर्चाची मर्यादा ?
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण उमेदवाराला अनामत रक्कम एक हजार रुपये, तर आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी पाचशे रुपये निश्चित करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या सर्वसाधारण उमेदवाराला सातशे रुपये, तर आरक्षित जागेवरील उमेदवारासाठी ३५० रुपये एवढी आहे. खर्चाची मर्यादा जिल्हा परिषदेसाठी नऊ लाख रुपये, तर पंचायत समितीसाठी सहा लाख रुपये एवढी आहे. उमेदवारांनी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यातून आवश्यक तो खर्च करून त्याचा दैनंदिन हिशेब द्यावयाचा आहे.

प्रभाव टाकणारे कार्यक्रम नको
वडगाव, तळेगाव दाभाडे व लोणावळा या नगर परिषद कार्यक्षेत्रात आचारसंहिता नाही. मात्र तरी ग्रामीण भागातील मतदारांवर प्रभाव टाकणारे उपक्रम अथवा कार्यक्रम या शहरांमध्ये घेता येणार नाहीत, असेही प्रांताधिकारी नवले यांनी स्पष्ट केले.

VDM26B11235

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIJAY HAZARE TROPHY Semi Final : विदर्भाचा पोट्टा अमन मोखाडेने इतिहास रचला; संघाला अंतिम फेरीत घेऊन गेला, कर्नाटकचा संघ हरला!

Exit Poll: ठाणेसह नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये कोण बाजी मारणार? एक्झिट पोलची आकडेवारी समोर

Kolhapur Corporation Exit Poll : सतेज पाटील बालेकिल्ला राखणार का?, कोल्हापुरात कोणाची सत्ता; एक्झिट पोल आला समोर

Akola Election Analysis : अकोला महापालिकेत कुणाला मिळेल ‘लाडक्या बहिणींची’ साथ? भाजपासह राष्ट्रवादी-शिंदेसेनेची प्रतिष्ठा पणाला!

Highway Emergency Helpline : ‘हायवे’वर गाडी बंद पडली, पेट्रोल संपलं चिंता नाही; फक्त एक फोन करा अन् तुमचं काम झालं!

SCROLL FOR NEXT