पिंपरी-चिंचवड

महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढणार

CD

वडगाव मावळ, ता.१८ : महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व १५ जागा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे व वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रविवारी कान्हे येथे पत्रकार परिषद घेतली. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे संघटक भारत ठाकर, युवा सेना प्रमुख उमेश गावडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे, तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, गणेश काजळे, विशाल वाळुंज, राजीव फलके, संदीप कदम, सहादू आरडे आदी उपस्थित होते. दत्तात्रेय पडवळ यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार वरिष्ठांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय झाला आहे. आघाडीतील घटक पक्ष सर्वच्या सर्व १५ जागा लढविणार असून, सर्व जागांवरील उमेदवारही तयार आहेत. येत्या दोन दिवसांत घटक पक्षाचे जागा वाटप निश्चित केले जाईल.
वंचितचे लोखंडे म्हणाले, ‘‘तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपकडून लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सुरू आहे. ती वाचविण्यासाठी ही आघाडी आहे.’’ काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मोहोळ म्हणाले, ‘‘लोकशाही टिकविण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपला सक्षम पर्याय म्हणून ही आघाडी रिंगणात उतरणार आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल.’’ मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे म्हणाले, ‘‘तालुक्यातील विरोधी पक्ष संपविण्याचे काम सध्या सुरू आहे. सक्षम विरोधी पक्ष टिकून राहावा या उद्देशाने महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.’’ युवा सेनेचे अध्यक्ष उमेश गावडे यांनीही तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा असल्याचे सांगितले. कितीही दबाव आला तरी निवडणुकीच्या रिंगणात शेवटपर्यंत महाविकास आघाडी म्हणून कायम राहण्याचा निर्धार या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT