पिंपरी-चिंचवड

भैरवनाथ उत्सवानिमित्त निगडे येथे कार्यक्रम

CD

वडगाव मावळ, ता. १९ : मावळ तालुक्यातील निगडे येथे श्री काळभैरवनाथ देवाच्या उत्सवानिमित्त २१ ते २५ जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच भिकाजी भागवत यांनी दिली.
सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, सकाळी ९ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ कीर्तन असा दिनक्रम राहील. सप्ताहात अनुक्रमे शिवाजी महाराज आगिवले, गणेश महाराज जांभळे, रामदास महाराज घुडे, निकिताताई भांगरे यांची प्रवचने व निवृत्ती महाराज देशमुख, सागर महाराज शिर्के, पुरुषोत्तम महाराज पाटील, माउली महाराज पठाडे यांची कीर्तने होतील. २५ जानेवारीला सकाळी १० ते १२ या वेळेत नितीन महाराज काकडे यांचे काल्याचे कीर्तन होईल. सोमवारी(ता. २६) श्री काळभैरवनाथ उत्सवानिमित्त सकाळी अभिषेक, सकाळी ८ वाजता मांडव टाहाळा, रात्री ८ वाजता पालखी मिरवणूक व १० वाजता पवळेवाडी येथील श्रीराम कला नाट्य मंडळाचे भजनी भारूड होईल. २७ तारखेला सकाळी ९ वाजता भारुडाची हजेरी होईल. समस्त ग्रामस्थांनी उत्सवाचे संयोजन केले आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच भागवत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : “शहरविकासाला गती द्या, जनतेसाठी काम करा”– अजित पवारांचे नवनिर्वाचित नगरसेवकांना स्पष्ट निर्देश!

Latest Marathi News Live Update : नाशिकमधल्या पिंपळगाव मोर इथं चारचाकी आयशर ट्रक स्लिप

तेव्हा अहिल्यादेवी सोडणार होत्या 'पारू' मालिका; म्हणाल्या- एकटीच बसून रडत होते...;असं काय घडलेलं?

Pune History : औरंगजेबने का बदललं होतं पुण्याचं नाव? बुधवार पेठेला दिलेली नातवाच्या नावाने ओळख, मग त्याच्यासोबत जे झालं....

Sangli Muncipal : मॅच टाय नको! सांगली महापालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला; सेना-राष्ट्रवादीस खुले आमंत्रण

SCROLL FOR NEXT