पिंपरी-चिंचवड

मनरेगा कंत्राटी संघटनेचे शुक्रवारपासून आंदोलन

CD

वडगाव मावळ, ता. १९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत(मनरेगा) कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करावे व नोकरीबाबत तत्काळ संरक्षण प्रदान करण्यात यावे, अशा मागण्या मनरेगा कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी संघटना येत्या शुक्रवारपासून (ता. २३) आंदोलन करणार आहे. आंदोलनाचे टप्पे असून त्यातून मार्ग निघाला नाही तर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
मावळ पंचायत समितीमधील मनरेगाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौरभ साबळे, प्रतीक बुरकुले, सारिका लाड, अश्विनी कुलकर्णी आदींनी राज्याचे रोजगार हमी योजना (रोहयो) समिती अध्यक्ष तसेच आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन त्यांना आंदोलनाबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तहसिल कार्यालय, पंचायत समिती अशा विविध कार्यालयांत मनरेगाचे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी विविध पदांवर कार्यरत आहेत. ग्रामीण दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास व प्रत्येक कुटुंबास रोजगाराची हमी देण्याचे कार्य करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. आमच्या प्रयत्नांमुळेच मनरेगा योजनेत महाराष्ट्र देशपातळीवर अग्रस्थानी आहे. इतर समकक्ष योजनांतील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत अथवा आवश्यक संरक्षण प्रदान करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मनरेगा योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, ही बाब खेदजनक व अन्यायकारक आहे. याव्यतिरिक्त, रोहयो विभागामार्फत विविध खासगी कंपन्यांची मनुष्यबळ सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करून मनरेगा योजनेतील कर्मचाऱ्यांची अप्रत्यक्षपणे पिळवणूक करण्यात येत आहे. त्याद्वारे मनरेगा योजने अंतर्गत सर्व पदाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा सुरक्षेवर गदा येत आहे. तसेच भविष्यातील उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर व आक्षेपार्ह स्वरूपाचा असून याबाबत रोहयो विभागाने तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.
मनरेगा अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतर योजनेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत नियमित करावे. इन्फोटेक कंपनी मार्फत होणारी अनधिकृत व अवैध कर्मचारी भरती रद्द करून समान काम समान वेतन धोरण लागू करावे. इतर विभागाप्रमाणे मनरेगा विभागाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून पद निहाय आकृती बंध तयार करावेत अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. २३ ते २७ जानेवारी दरम्यान काळ्या फिती लावून काम केले जाणार आहे. २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान असहकार व काम बंद आंदोलन केले जाणार आहे. दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान मुंबई येथील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. सहा ते दहा फेब्रुवारी दरम्यान साखळी उपोषण व ११ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka DGP's Misconduct : महिलेसोबत ‘डीजीपी’चे असभ्य वर्तन!, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी व्यक्त केला संताप

IND vs NZ, ODI: 'मी नाव घेणार नाही, पण...' गावसकरांनी सांगितले न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाला कोण जबाबदार?

Bajaj Pune Grand Tour Traffic Update : 'बजाज पुणे ग्रँड टूर स्टेज-2'साठी २१ जानेवारीला पुण्यातील वाहतुकीत बदल!

Team India Under Gambhir: 'अजिंक्य' टीम इंडियाची घरच्या मैदानावर वाताहत; कोच गौतम गंभीरचे रिपोर्ट कार्ड पाहून बसेल धक्का!

Ambegaon Political : आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादीला धक्का; माजी उपाध्यक्ष अरुण गिरे यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश!

SCROLL FOR NEXT