पिंपरी-चिंचवड

मावळात १०४ अर्ज दाखल

CD

वडगाव मावळ, ता. २१ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी २७ जणांचे ३५, तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी ५२ जणांचे ६९ असे एकूण ७९ जणांचे १०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या निवडणूका पाच फेब्रुवारीला होतील.
निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले व सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी ही माहिती दिली. कुसगाव बुद्रूक-काले जिप गटात सर्वाधिक ११, तर वराळे पंचायत समिती गणात सर्वाधिक १२ अर्ज दाखल झाले. बुधवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवार तसेच कार्यकर्त्यांची गर्दी झाली. गुरुवारी (ता. २२) उमेदवारी अर्जांची छाननी होईल.
पाच दिवसांत केवळ २९ अर्ज दाखल झाले होते. शेवटच्या दिवशी तब्बल ७५ अर्ज झाले. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय, वंचित बहुजन आघाडी आदी पक्षांसह अनेक अपक्षांनी अर्ज दाखल केले.
शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडीही घडल्या. काही जणांनी पक्षाचा आदेश नसताना अर्ज दाखल केले, तर काही जणांनी इतर पक्षांकडूनही अर्ज दाखल केले. त्यामुळे २७ तारखेला अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल.
दाखल अर्जांची संख्या :
जिल्हा परिषद गट - टाकवे बुद्रूक-नाणे ६, वराळे-इंदोरी ६, खडकाळे-कार्ला ६, कुसगाव बुद्रूक-काले ११, सोमाटणे-चांदखेड ६.
पंचायत समिती गण व - टाकवे बुद्रूक ६, नाणे ३, वराळे १२, इंदोरी ९, खडकाळे ५, कार्ला ७, कुसगाव बुद्रूक ७, काले ६, सोमाटणे ९, चांदखेड ५.
---
भाजप उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन
मंगळवारी पवन मावळात सायकल स्पर्धेमुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद होते. त्यामुळे भाजपच्या सोमाटणे-चांदखेड गट व सोमाटणे व चांदखेड गणातील उमेदवारांनी बुधवारी वडगाव येथे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. येथील खंडोबा मंदिरापासून ढोल लेझीम पथकासह रॅली काढण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. पंचायत समिती चौकात जाहीर सभा झाली. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, प्रदेश भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती निवृत्ती शेटे, एकनाथराव टिळे, गुलाबराव म्हाळसकर, प्रशांत ढोरे, माजी उपसभापती शांताराम कदम, सचिन घोटकुले, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, बाळासाहेब घोटकुले, आण्णासाहेब भेगडे, किरण राक्षे, शामराव राक्षे, सुमित्रा जाधव, ॲड. मृणाल म्हाळसकर, बाबूलाल गराडे, अविनाश गराडे, सूर्यकांत सोरटे आदी उपस्थित होते. अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त करून गटातील तीनही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT