वडगाव मावळ, ता. १२ : ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था आणि उमेद अभियान (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१६) वडगाव येथे एक दिवसीय कौशल्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वडगाव येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात सोमवारी सकाळी ११ वाजता हा मेळावा होईल. या मेळाव्यात ग्रामीण भागातील युवक-युवतींना उद्योजकता विकास, स्वयंरोजगाराच्या विविध संधी, बँक कर्ज प्रक्रिया, शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच ‘नॅशनल स्कील क्वालिफिकेशन फ्रेमवर्क’ मानांकन प्राप्त प्रशिक्षण अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. रूडसेट संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध निवासी व अनिवासी विनामूल्य प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नावनोंदणीही या मेळाव्यात केली जाणार आहे. उद्योग उभारणी, उत्पादन प्रक्रिया, प्रकल्प अहवाल तयार करणे, विपणन कौशल्य तसेच बँकिंग व वित्तीय मार्गदर्शन या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी उमेद तालुका अभियान कक्ष, पंचायत समिती मावळ येथे संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.