वडगाव मावळ, ता. १६ : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड-घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने लोहगड किल्ल्यावर महाशिवरात्र उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला भाजे, लोहगड व घेरेवाडी भजनी मंडळाच्या वतीने गडावर हरिजागर करण्यात आला. लोहगडावरील महादेव मंदिरात पंचायत समिती सदस्या रेश्मा देवकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून ढोल, ताशा, हलगी, तुतारी या पारंपारिक वाद्यांच्या गजरात शिव पालखीची मिरवणूक काढण्यात आली. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात आले. शिव स्मारकावर फुलांनी व सडा रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. शिववंदनेने, पुष्पवृष्टी करून शिवस्मारकावर अभिवादन करण्यात आले. तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रकाश मिठभाकरे, संदीप जाधव, नगरसेवक सूरज सातकर, नितीन बारणे, मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, अध्यक्ष विश्वास दौंडकर आदी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सोनाली बैकर यांनी आभार मानले. उद्योजक चंद्रकांत भन्साळी यांच्या वतीने शिवभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत लोहगडचा समावेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर गडावर आनंदाचे वातावरण होते. लोहगड विसापूर विकास मंचाला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे दुग्धशर्करा योग जुळून आल्याची भावना मंचाचे संस्थापक टेकवडे व अध्यक्ष दौंडकर यांनी व्यक्त केली. शिवस्मारक परिसरामध्ये शिवसृष्टी साकार व्हावी असा आशावाद शिवभक्तांनी व्यक्त केला.
विसापूर किल्ल्यावरही कार्यक्रम
लोहगड -विसापूर विकास मंच व पाटण ग्रामस्थ यांच्या वतीने विसापूर किल्ल्यावरील शिवमंदिरातही महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. सुंदर रांगोळी व फुलांनी शिवमंदिर सजविण्यात आले होते. यावेळी महादेवाचा अभिषेक संपन्न झाला. पाटण गावातील ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.