वडगाव मावळ, ता. २० : येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री रमेश कुमार साहनी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शिवजयंती पारंपरिक पद्धतीने व उत्साहात साजरी करण्यात आली.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव राजेंद्र वहिले, मुख्याध्यापिका मीना अय्यर आदींच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक प्रसंग सादर केले. विद्यार्थ्यांनी पोवाडा तसेच शिवजन्मापासून त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग नाटकाद्वारे सादर केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीमच्या गजरात शिवजन्मोत्सव साजरा केला. व्यवस्थापक आदिनाथ आगळमे, क्रीडा शिक्षक अभिषेक भालेराव, शिक्षक गणेश जगदाळे, रूपाली टाकवे, तोहीदा खान, रूपाली लोणकर, पुष्पा इंगुळकर आदींनी संयोजन केले.
वडगाव मावळ : येथील श्री रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.