पिंपरी-चिंचवड

रस्ता रुंदीकरणाबाबत मोबदला देण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. २३ : आंदर मावळातील कान्हे-खांडी-सावळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकरी, टपरी धारक, घरमालकांना मोबदला मिळावी, अशी मागणी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, पंचायत समिती सदस्या आशा मोरमारे, प्राची गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, माजी सरपंच राजेश कोकाटे, बाळासाहेब दाते, नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, रवींद्र जानकर, बाळासाहेब पावशे, विक्रम हेमाडे आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे सुमारे ३३३ कोटी रुपये खर्चाचे काम चालू आहे. हा रस्ता आंदर मावळच्या विकासासाठी प्रगतीचे पाऊल आहे, मात्र रस्ता रुंदीकरण कामात अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र बाधित होत आहे. त्या सर्वच शेतकरी बांधवांना पूर्व सूचना दिलेली दिसून येत नाही. त्यामुळे क्षेत्र बाधित शेतकरी, टपरी धारक, घरमालक यांना शासकीय निकषानुसार नुकसान भरपाई व मोबदला मिळणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होताना दिसत नाही. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर, नवनाथ बन यांना बढती, तर कृष्णराज महाडिकांना मोठी जबाबदारी; वाचा संपूर्ण यादी

Yavatmal Hailstorm: यवतमाळ जिल्ह्याला गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी हवालदिल, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान

Eknath Shinde: दादांचा निरोप घेण्याचा निर्णय चुकला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधिमंडळात भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली,नेत्यांना अश्रू अनावर..

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्यामुळे श्री संत गजानन महाराज दर्शन वेळेत बदल...

Successful Transplant: दीड वर्षांच्या प्रदीपमुळे भावाला मिळाले नवजीवन; थॅलेसेमियाग्रस्त पाच वर्षीय संदीपला बोन मॅरो दान, उपचार यशस्वी!

SCROLL FOR NEXT