वडगाव मावळ, ता. २४ : आंदर मावळातील कान्हे-खांडी-सावळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकरी, टपरी धारक, घरमालकांना मोबदला मिळावा, अशी मागणी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, पंचायत समिती सदस्या आशा मोरमारे, प्राची गायकवाड, नारायण ठाकर, माजी सरपंच राजेश कोकाटे, बाळासाहेब दाते, नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, रवींद्र जानकर, बाळासाहेब पावशे, विक्रम हेमाडे आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता धनराज दराडे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, ‘‘या रस्त्याच्या रुंदीकरणाचे सुमारे ३३३ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र बाधित होत आहे. मात्र, त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.