पिंपरी-चिंचवड

रस्ता रुंदीकरणाबाबत मोबदला देण्याची मागणी

CD

वडगाव मावळ, ता. २४ : आंदर मावळातील कान्हे-खांडी-सावळा रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकरी, टपरी धारक, घरमालकांना मोबदला मिळावा, अशी मागणी आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

याबाबत जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे, पंचायत समिती सदस्या आशा मोरमारे, प्राची गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, माजी सरपंच राजेश कोकाटे, बाळासाहेब दाते, नामदेव शेलार, अंकुश आंबेकर, रवींद्र जानकर, बाळासाहेब पावशे, विक्रम हेमाडे आदींनी तहसीलदार विक्रम देशमुख व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे सुमारे ३३३ कोटी रुपये खर्चाचे काम सुरू आहे. हा रस्ता आंदर मावळच्या विकासासाठी प्रगतीचे पाऊल आहे. मात्र, रस्ता रुंदीकरण कामात अनेक शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र बाधित होत आहे. त्या सर्वच शेतकरी बांधवांना पूर्वसूचना दिलेली दिसून येत नाही. त्यामुळे क्षेत्र बाधितांना भरपाई व मोबदला मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान लक्षात घेऊन रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना सहकार्य करावे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

SCROLL FOR NEXT