पिंपरी-चिंचवड

अध्यापक महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

CD

वडगाव मावळ, ता. २४ : येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयाचे विशेष समाजसेवा श्रमसंस्कार शिबिर भाजे येथे उत्साहात झाले.
श्रीमती शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयात आयोजित शिबिराचे उद्‍घाटन मुख्याध्यापक संतोष पवार यांच्या उपस्थितीत झाले. श्रमदानामध्ये शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. वाचन संस्कृती वृद्धी अभियानांतर्गत पथनाट्य सादरीकरणातून वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. माता जागरूकता व बालक पोषण आहार अभियानांतर्गत डॉ. मीनाक्षी म्हाळगे यांनी आहाराविषयी मार्गदर्शन केले. संपर्क बालग्राम संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी व ग्रामस्थांसाठी पाणी वाचवा, वीज वाचवा, लोककला व संस्कृती संवर्धन, ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण, वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छता या समाजप्रबोधन विषयांवर पथनाट्ये सादर केली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम झाले. शेकोटी पेटवून शेकोटीची गाणी म्हणत विद्यार्थ्यांनी लोकगीतांचाही आस्वाद घेतला.
संस्थेचे संचालक सदस्य राज खांडभोर, शरद मालपोटे यांनी शिबिरास भेट दिली. दुसऱ्या दिवशी भाजे लेण्यांना क्षेत्रभेट देण्यात आली. पाणी वाचवा, वीज वाचवा अंतर्गत ग्रामस्थांकडून प्रश्नावल्या भरून घेतल्या. ओला कचरा-सुका कचरा विलगीकरणाची परिपत्रकांचे वाटप करण्यात आले. विद्यालय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. लोककला व संस्कृती कौशल्य विकसनाअंतर्गत ज्ञानेश्वर गायखे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना रांगोळी रेखाटनाचे प्रशिक्षण दिले. शिबिर समारोपासाठी सरपंच प्रिया ओव्हाळ उपस्थित होत्या. समाज प्रतिबद्धता विभाग प्रमुख म्हणून प्रा. डॉ. शीतल देवळालकर यांनी कामकाज पाहिले. प्राचार्या डॉ. अनिता धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पूर्ण झाले. संस्थेचे संस्थापक मदन बाफना, अध्यक्ष तुकाराम असवले, सचिव अशोक बाफना यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Scheme: गर्भलिंग निदानाची माहिती द्या एक लाख मिळवा; स्त्रीभ्रूण हत्यांना आळा घालण्यासाठी सरकारचे पाऊल, काय आहे खबरी योजना?

Pimpri Chinchwad: अतिक्रमणांचा विळखा; कारवाई कागदोपत्रीच, रुपीनगर अंकुश चौक मार्गाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : नाशिक- पुणे महामार्गावर सुरू असलेले हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन मागे

Mumbai News: कलिना विद्यापीठाच्या जागेचे सीमांकन करा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेत सत्तेचे समीकरण बदलणार? स्थायी समिती सभापतिपदासाठी बुधवारी चुरस

SCROLL FOR NEXT