पिंपरी-चिंचवड

सभापती, उपसभापती निवड सोमवारी

CD

वडगाव मावळ, ता. ५: मावळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता.५) होणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत. पक्षाने सभापती पदासाठी सुनीता येवले आणि उपसभापतीदासाठी साहेबराब कारके यांची नावे यापूर्वीच निश्चित केली आहेत.

महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. सुमारे तीस वर्षांच्या कालावधीनंतर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात यश आले. या निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांचा पराभव झाला. त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

दरम्यान, सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ( ता.९ ) निवडणूक होणार आहे. सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले या एकमेव सदस्या आहेत. पक्षानेही त्यांच्या नावावर यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. तर उपसभापती पदासाठी सोमाटणे गणातून विजयी झालेले साहेबराव कारके यांचे नाव निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व दहा सदस्य असल्याने या दोघांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे: सकाळी १०.३० ते ११: सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे. दुपारी १२.३० पासून विशेष सभेचे कामकाज सुरू करणे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात मावळसह आठ ते नऊ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT