पिंपरी-चिंचवड

सभापती, उपसभापती निवड सोमवारी

CD

वडगाव मावळ, ता. ६ : मावळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी (ता.५) होणार असून प्रदीर्घ कालावधीनंतर ही दोन्ही पदे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहेत. पक्षाने सभापती पदासाठी सुनीता येवले आणि उपसभापतीदासाठी साहेबराब कारके यांची नावे यापूर्वीच निश्चित केली आहेत.

महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा अशा सर्वच्या सर्व पंधरा जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. सुमारे तीस वर्षांच्या कालावधीनंतर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकविण्यात यश आले. या निवडणुकीत भाजपसह अन्य पक्षांचा पराभव झाला. त्यांना एकही जागा मिळवता आली नाही.

दरम्यान, सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी ( ता.९ ) निवडणूक होणार आहे. सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे. या प्रवर्गातून चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले या एकमेव सदस्या आहेत. पक्षानेही त्यांच्या नावावर यापूर्वीच शिक्कामोर्तब केलेले आहे. तर उपसभापती पदासाठी सोमाटणे गणातून विजयी झालेले साहेबराव कारके यांचे नाव निश्चित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व दहा सदस्य असल्याने या दोघांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित आहे. निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे: सकाळी १०.३० ते ११: सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणे. दुपारी १२.३० पासून विशेष सभेचे कामकाज सुरू करणे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात मावळसह आठ ते नऊ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT