पिंपरी-चिंचवड

वडगावात विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी

CD

वडगाव मावळ, ता. ८ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीची भव्य मिरवणूक, महिला व मुलांसाठी विविध स्पर्धा, गुणवंतांना पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांनी व उत्साहाच्या वातावरणात शिवजयंती महोत्सव साजरा झाला.
शिवजयंतीनिमित्त येथील राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव समितीच्या वतीने चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (ता. ४) ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणी’चा हा स्पर्धात्मक कार्यक्रम झाला. गुरुवारी (ता. ५) सायंकाळी आझाद महाराज गुजर यांचे शिवचरित्रावर कीर्तन झाले. शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त सकाळी विविध किल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे लायन्सच्या वतीने स्वागत करण्यात आले. सहजयोग केंद्राच्या सहभागाने शिवजन्मोत्सव साजरा झाला. सायंकाळी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवभक्त व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा झाला. भामाबाई चव्हाण यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार, नितीन महाराज काकडे (सांप्रदायिक भूषण), भरत प्रभाकर जोरी (कृषीनिष्ठ), दिलीप सोनीगरा (उद्योग रत्न), नवीनचंद्र बोऱ्हाडे (कर्तव्यदक्ष), पै. प्रतीक देशमुख (क्रीडा रत्न) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माजी सभापती एकनाथराव टिळे, बाजार समितीचे माजी सभापती बबनराव भोंगाडे, शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, विश्वस्त ॲड. अशोक ढमाले, अरुण चव्हाण, नारायण ढोरे, नगरसेवक अनंता कुडे, विशाल वहिले, अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, राहुल धडवले, संदीप म्हाळसकर आदी उपस्थित होते. ॲड. विजय जाधव व संपत म्हाळसकर यांनी सूत्रसंचालन केले. गायिका ज्योती गोराणे व तबला वादक शाम गोराणे यांच्यासह महिला कलाकारांच्या आविष्कारातून जागर स्त्री शक्तीचा उत्सव परंपरेचा हा कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्ष कुलदीप ढोरे, संतोष भिलारे, संतोष चव्हाण, गणेश वहिले, रोहित गिरमे, सुनील कुडे, प्रवीण पाटोळे, गणेश तांबे, युवराज म्हाळसकर, संतोष नवघणे आदींनी संयोजन केले.

वडगाव मावळ : शिवजयंतीनिमित्त राजे शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याची काढण्यात आलेली भव्य मिरवणूक.
वडगाव मावळ : शिवजयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविताना मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT