पिंपरी-चिंचवड

वारकरी संप्रदाय मंडळाचा गुढीपाडव्याला वर्धापन दिन

CD

वडगाव मावळ, ता. १० : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी (ता. १९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार भसे यांनी ही माहिती दिली. कान्हे येथील साईबाबा सेवाधाम संस्थेच्या सभागृहात कार्यक्रम होईल. सकाळी आठ ते दहा या वेळेत भजन होईल. त्यानंतर प्रतिमा पूजन, वार्षिक सर्वसाधारण सभा, अहवाल प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ समाजसेवक पांडुरंग उंडे (करंजगाव), ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज ठाकर (माळेगाव) व समाजसेवक नितीन घोटकुले (आढले) यांना ‘मावळरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येईल. डॉ. अमित वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, नगराध्यक्षा अबोली ढोरे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे आदी उपस्थित राहणार आहेत.
भसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वावरे, सचिव रामदास पडवळ, कार्याध्यक्ष संतोष कुंभार, ॲड.सागर शेटे, नितीन अडीवळे आदींनी संयोजन केले आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Akola News: शहरासह पातूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार;रेशन माफिया सक्रिय; शासकीय धान्य परप्रांतात करत आहेत विक्री; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Indian Navy Chief: कोण आहेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन? पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती

Nilesh Lanke Health Update : खासदार निलेश लंके हेल्थ अपडेट आली, विषाणूजन्य ताप; डॉक्टरांनी दिला अहवाल

एका न्यायाधीशाच्या वाक्याने बदललं CJI Surya Kant यांचं भविष्य; वकिलाची याचिका फेटाळताना सांगितला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का

SCROLL FOR NEXT