वडगाव मावळ, ता.१२ : ‘‘नवीन वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ बंधारा येथे नवीन जॅकवेल करण्याचे काम चालू असल्याने जांभूळ जॅकवेल येथून काही भागांत होणारा पाणीपुरवठा पुढील २० ते २५ दिवस गढूळ राहील. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे’’, असे आवाहन वडगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
डॉ. निकम यांनी म्हटले आहे की, राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत वडगाव शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या नवीन वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत जांभूळ बंधारा येथे नगरपंचायतीमार्फत नवीन जॅकवेल करण्याचे काम चालू आहे. नगरपंचायत प्रशासन नागरिकांच्या आरोग्याबाबत पूर्णपणे सजग असून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनी कोणतीही अडचण असल्यास नगरपंचायतीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.’’
दुरुस्ती काम पूर्ण
संस्कृती जलशुद्धीकरण केंद्र येथे मागील १० दिवस दुरुस्तीचे काम चालू होते. ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे तेथे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही डॉ. निकम यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.