पिंपरी-चिंचवड

वसंतचैतन्य व्याख्यानमालेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

वडगाव मावळ, ता.१९ : मावळ शिक्षक प्रबोधन परिवाराच्यावतीने आदर्शांच्या जन्मोत्सव महिन्यानिमित्त आयोजित तीन दिवसीय वसंतचैतन्य व्याख्यानमालेला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्याख्यानमालेचे उद्‍घाटन आमदार सुनील शेळके व कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारिका शेळके यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी प्रसिद्ध कवियत्री गुंजन पाटील यांचे ‘जाऊ कवितांच्या गावा’ या विषयावर व्याख्यान झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि भावविश्व जागवले, तर शिक्षण अधिक अर्थपूर्ण ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांचे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयावर व्याख्यान झाले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील छोट्या क्षणांनाही दिशा दिली, तर त्यातून मोठे परिवर्तन घडू शकते, असे त्यांनी नमूद केले. तर तिसऱ्या दिवशी ‘वेदना जाणावयास जागवू सहवेदना’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना समाजसेवक यजुवेंद्र महाजन म्हणाले, ‘‘वेदना समजून घेणं आणि सहवेदना जागवणं हीच खरी शिक्षणाची ताकद आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावनांशी जोडले गेले, तर समाज अधिक संवेदनशील बनेल.’’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती सुनीता येवले होत्या. विशेष अतिथी म्हणून उद्योजक अशोक बाफना, प्रवीण भोसले, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर उपस्थित होते. व्याख्यानमालेत दररोज १५ गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: आता मंत्र्यांसोबत फक्त एकालाच प्रवेश; फक्त आमदार-खासदारांनाच वेटिंग रूममध्ये प्रवेश, मंत्रालयात नवे नियम लागू

Pune Railway Station: ट्रेन लेट? टेन्शन नाही! पुणे रेल्वे स्टेशनवर 300 रुपयात मिळणार हाय-टेक स्लीपिंग पॉड, प्रवाशांसाठी खुशखबर!

IPL 2026: वैभव सूर्यवंशी बरसला, पण चक्रवर्ती-नरेनच्या फिरकीसमोर RR च्या फलंदाजांनी नांगी टाकल्या; KKR ला खऱ्या अर्थाने सूर गवसला

"मला हालचाल होतेय असं जाणवलं" प्रिया बेर्डेनी शेअर केला भयंकर अनुभव "त्यानंतर मी रात्रीचा प्रवास केला नाही"

MPSC Success Story: मरकळच्या शेतकरी कन्येची भरारी; स्नेहल लोखंडे स्टेट टॅक्स असिस्टंट, आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू..

SCROLL FOR NEXT