पिंपरी-चिंचवड

शासकीय कर्मचारी संपामुळे तिसऱ्या दिवशीही काम ठप्प

CD

वडगाव मावळ, ता. २३ : विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने मावळ तालुक्यातील कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. विविध मागण्यांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यात मावळ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. जनतेशी निगडित विविध संघटनांचा त्यात सहभाग असल्याने दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार असा अधिकारी वर्ग वगळता सर्व कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे जनतेची बहुतांशी कामे ठप्प झाली आहेत. सर्व प्रकारच्या केसेस लांबणीवर पडल्या आहेत. तलाठी व मंडल अधिकारी नसल्याने विविध प्रकारचे दाखले व उतारे मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी असल्याने खरेदी विक्री, दस्त नोंदणीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारीही संपावर असल्याने कामे थांबली आहेत. महसूल खात्याशी संबंधित कामकाज विस्कळीत झाले आहे. सर्वच नागरिकांना या आंदोलनाची माहिती नसल्याने तालुक्यातील विविध गावातून नागरिक कामासाठी येथील कार्यालयात आले होते. मात्र, कामकाज बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले व मनस्ताप सहन करावा लागला. त्यांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय झाला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT