पिंपरी-चिंचवड

वडगावातील गॅस बुकिंग २५ दिवसांचे करा

CD

वडगाव मावळ, ता. २८ : वडगाव शहरातील घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे बुकिंग २५ दिवसांचे सुरू करून शहरातील गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी वडगाव शहर सेवानिवृत्त कर्मचारी व ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीने केली आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे, समन्वयक नितीन भांबळ, बारकू ढोरे, शांताराम कुडे, मंगेश ढोरे, मारुतराव चव्हाण, लक्ष्मण ढोरे, चंद्रकांत राऊत, अर्जुन ढोरे, ज्ञानेश्वर ढोरे, बाळकृष्ण ढोरे, श्रीधर ढोरे, बाळासाहेब ढोरे आदी पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख आदींना याबाबत साकडे घातले आहे.
वडगाव शहरात पूर्वी २१ दिवसाने एचपी गॅस सिलिंडर बुकिंग होत होते. परंतु मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन नियमानुसार २५ दिवसाने बुकिंग होत नाही. वडगाव शहरातील एचपी गॅस एजन्सीकडून ग्राहकांना ४५ दिवसांचा बुकिंग दिनांकचा मेसेज येत आहे. ४५ दिवसांच्या बुकिंगनंतर एजन्सीकडे नागरिक रांग लावतात. सिलिंडरचा अपुरा पुरवठ्यामुळे रिकामा सिलिंडरसह वृद्ध, महिला, नागरिक यांना एजन्सीकडे हेलपाटे मारावे लागतात. अन्य पर्यायी इंधन (लाकूड, कोळसा) स्वयंपाकासाठी वडगाव शहरात उपलब्ध होत नाही. त्यामुळे मागील दीड महिना नागरिकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. कुटुंबाला उपजीविकेसाठी धावधाव व मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकांनी तोंडी तक्रार, निवेदन दिले आहेत. अन्य शहरांमध्ये २५ दिवसाने सिलिंडर बुकिंग होत आहेत. परंतु वडगावातील एलपीजी गॅस सिलिंडर एजन्सीमुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एलपीजी गॅस सिलिंडरचे बुकिंग २५ दिवसांचे सुरू करून गॅस पुरवठा सुरळीत करावा.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole News: उन्हाच्या झळांनी घेतला जीव; अकोले तालुक्यातील शेतकरी कोसळून मृत, ४१ अंश तापमानात दुर्दैवी घटना..

Latest Marathi News Live Update : खोपोली पेण रस्त्यावर हायवा डंपरला लागली आग

रस्त्याच्या कामाच्या बिलावर २ टक्के मागणी, लाच घेताना ZP इंजिनिअरसह ३ अधिकाऱ्यांना अटक

Mahad Chavdaar Tale: इतिहास जागा झाला! चवदार तळ्यातील ११ विहिरींचे दर्शन, ऐतिहासिक लढ्याच्या साक्षीदारांना पाहण्यासाठी गर्दी..

Medical College: ‘सिव्हिल’ आता होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय: ४४८ पदांसाठी अध्यादेश, पुढच्या वर्षी पहिल्या बॅचचे ॲडमिशन

SCROLL FOR NEXT