वडगाव मावळ, ता. २८ : पुणे रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी रात्री वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून घसरला. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. याचा मंगळवारी लोकलनाही फटका बसला. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले.
मंगळवारी दुपारी एकनंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली, मात्र त्याआधी शिवाजीनगरपर्यंतच लोकल सेवा सुरू होती. त्यातच सकाळी घाईच्या वेळी लोकल सुमारे तासभर विलंबाने धावत होत्या. शिवाजीनगरहून इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांना वेळ आणि पैशाचा भुर्दंड सोसावा लागला. दुपारपर्यंत पुणे स्थानकावरून एकही लोकल न सुटल्यामुळे त्या प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली. त्यांना अन्य वाहनाने शिवाजीनगर स्थानकावर येऊन लोकल पकडावी लागली.
लोकल गाड्या स्थानकामध्ये थांबवून लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्याने पुढे सोडले जात असल्याचा आतापर्यंतचा अनुभव होता. मंगळवारी सकाळी मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या विविध स्थानकांमध्ये थांबवून लोकल पुढे सोडल्याचा सुखद अनुभव नोकरदारांना आला. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानावे लागतील.
- सुधाकर गुरव, रेल्वे प्रवासी
---
मंगळवारी सकाळी पावणे आठची लोकल एक तास विलंबाने शिवाजीनगर स्थानकावर पोचली. ती पुढे न गेल्याने बाहेर जाऊन इतर वाहनाने पुणे स्थानकापर्यंतचा प्रवास करावा लागला. ऐन उन्हात प्रवाशांचे हाल झाले.
- बाळासाहेब राठोड, रेल्वे प्रवासी
-----
मंगळवारी सकाळी लोकल उशिरा धावत होत्या. सकाळी साडे दहाची लोकल सुमारे अर्धा तास उशिरा आली. त्यामुळे महाविद्यालयात पोचायला उशीर झाला.
- रिया काकडे, विद्यार्थिनी
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.