वडगाव मावळ, ता. २८ : मावळ तालुक्यातील गोडुंब्रे व ओवळे येथील सरपंचपदासाठी तसेच सांगिसे ग्रामपंचायत सदस्याच्या एका जागेसाठी मंगळवारी उत्स्फूर्त मतदान झाले. यात गोडुंब्रे येथे ८७.८८ टक्के, ओवळे येथे ८३.११ टक्के; तर सांगिसे येथे ९१.९२ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी बुधवारी (ता.२९) सकाळी १० वाजता वडगाव येथे होणार आहे, अशी माहिती तहसीलदार विक्रम कदम यांनी दिली.
या तीन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. तिन्ही जागांवर सरळ लढत होती. मतदानासाठी तीन गावांमध्ये सात मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. झालेले मतदानपुढील प्रमाणे : ओवळे : ५७२ पुरुष, ५२४ महिला, एकूण १ हजार ९६ (८३.११ टक्के), गोडुंब्रे : ३९३ पुरुष, ४०८ महिला, एकूण ८०१ (८७.८८ टक्के), सांगिसे : १६६ पुरुष, १८७ महिला, एकूण ३५३ (९१.९२ टक्के). मतमोजणी बुधवारी सकाळी दहा वाजता वडगाव येथील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.