पिंपरी-चिंचवड

‘रोजलँड’च्या चेअरमनसह संचालक मंडळ पुनर्स्थापित उपनिबंधकांच्या बरखास्तीच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

CD

वाकड, ता. १४ ः केंद्र व राज्य सरकारचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या व परिसरात उत्तम नाव लौकिक असलेल्या पिंपळे सौदागर येथील रोजलँड रेसिडेन्सी सोसायटीच्या चेअरमन, सेक्रेटरीसह संपूर्ण संचालक मंडळ उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्या निर्णयास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे उपनिबंधक यांनी सोसायटीचे संचालक मंडळ पुनर्स्थापित करून, प्रशासकाकडून सोसायटीचा कारभार काढून घेत समितीच्या ताब्यात दिला आहे.
आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार केल्याचा आरोप करीत गृहसंस्थेच्या काही रहिवाशांनी सह्यांचा तक्रारअर्ज उपनिबंधकांना देत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत, उपनिबंधक यांनी त्यांना पाच वर्षांकरिता अपात्र घोषित केले होते. या अपात्रतेच्या निर्णयाविरुद्ध पदाधिकारी व संचालक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. संचालक मंडळाची बाजू ऐकून घेत बरखास्तीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

‘‘सोसायटीचे कामकाज कायदा व पोटनियमांना अनुसरून व्यवस्थित चालू होते. पंधरा वर्षांपासून वार्षिक-मासिक सभा, ऑडिट इत्यादी वेळेत घेतल्या गेल्यात. मात्र काहींनी आकसापोटी सोसायटीचे नुकसान करण्यासाठी खोटी कारणे सांगत सभासदांची दिशाभूल करून, सह्या घेतल्या. मात्र, नेहमी सत्याचा विजय होतो हे पुन्हा सिद्ध झाले.
- संतोष मस्कर,
चेअरमन, रोजलँड रेसिडेन्सी


‘‘उच्च न्यायालयाचा आदेश व प्रशासकाची बदली याच्याआधारे समिती आरोपांमध्ये निर्दोष आढळली. आरोपमुक्त झाली. त्यामुळे ती पुन्हा स्थापित केल्याचा दिशाभूल करणारा संदेश प्रसारित केला जात आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मागील समितीचा अपात्रतेचा आदेश रद्द केलेला नाही. केवळ आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तांत्रिक प्रक्रिया म्हणून, सोसायटीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यालाही काढून टाकण्यात आले आणि जुन्या समितीकडे सोपवण्यात आले आहे.
- चंदन चौरसिया,
सदस्य तक्रारदार गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगालमध्ये भाजपचा 'खेला'; ममतांचा पराभव करण्यासाठी काढला हुकुमाचा एक्का, कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

Whatsapp Guest Chats : आता अकाऊंट नसताना चालणार WhatsApp! नंबर सेव्हपासून अन् ॲप डाउनलोड करण्यापर्यंतच टेन्शन संपणार, जाणून घ्या कसं?

Kolhapur Crime News : वंशाला दिवा पाहिजे म्हणून, कोल्हापुरात महिलेसोबत घडलं भयानक; नणंद, सासूने केलं धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : दिल्लीत एका व्यक्तीने पिस्तूल लोड करताना असताना स्वतःवरच गोळी झाडली

Pune News: इंदापुरात २९ गायी-वासरांची सुटका; तीन वासरांचा गुदमरून मृत्यू, दोघांविरुद्ध गुन्हा, धक्कादायक चित्र समोर!

SCROLL FOR NEXT