पिंपरी-चिंचवड

शिव कॉलनीत काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

CD

वाकड, ता. १० : गणेशनगर, थेरगाव येथील शिव कॉलनीत महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे व शिवलीलामृत ग्रंथ पारायणाचे गणेश महाराज कार्ले यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. सुमारे तीन हजाराहून अधिक भाविकांनी काल्याच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
मावळचे खासदार श्रीरंग ऊर्फ अप्पा बारणे यांच्या विशेष सहकार्यातून व प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तत्पूर्वी सप्ताहात रामचंद्र महाराज शिंदे, गायनाचार्य लक्ष्मण महाराज पांचाळ, शेखर महाराज जांभूळकर, प्रमोद महाराज पवार, शिवाजी महाराज खंडागळे, रामलिंग महाराज मोहिते, पांडुरंग महाराज शितोळे, महावीर महाराज सूर्यवंशी यांच्या प्रवचन सेवेचा लाभ भाविकांनी घेतला. दररोज पहाटे ४ ते ६ काकड आरती, शिवलीलामृत, गाथा भजन, दुपारी महिला भजनी मंडळाची सेवा, सायंकाळी प्रवचन नंतर हरिपाठ, कीर्तन, रात्री दहाच्या पुढे सार्वजनिक जागर होत असे.
महाशिवरात्री उत्सवाला मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली होती. सायंकाळी परिसरातून टाळ-मृदंगाच्या गजरात व महिलांच्या फुगडीच्या रिंगणात निघालेल्या महादेवांच्या पालखीचे जागोजागी रांगोळीच्या पायघड्या घालून व फुलांच्या वर्षावात स्वागत झाले. सदाशिव कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. शिव कॉलनी मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्तम व्यवस्थापन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Sharad Pawar: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी घेतली दखल; ‘सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधावा’

करकायदा : ‘आयटीसी’बाबत सुधारणा...

आजचे राशिभविष्य - ०५ ऑक्टोबर २०२६

शेअर बाजार : रेटगेन ट्रॅव्हल टेक्नॉलॉजीज (गुरुवारचा बंद भाव : रु. ८४१)

SCROLL FOR NEXT