पिंपरी-चिंचवड

थेरगावातील मिळकतींच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षक नेमावेत

CD

वाकड, ता. ९ : थेरगाव परिसरात महापालिकेने केलेली सुशोभिकरणे, उद्याने, महापुरुषांची पुतळे, भवन, विविध विकासकामे, आरक्षणे व महत्त्वपूर्ण मिळकतींचे जतन व रक्षण करण्यासाठी तत्काळ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी व त्या भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे माजी प्रभाग सदस्य संतोष बारणे यांनी मागणी केली आहे.
थेरगाव गावठाणातील कामगार नेते शरद गावडे भवनशेजारीच अनेक दारूचे अड्डे आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेऊन तळीराम महफीली सजवतात. वस्तूंची तोडफोड करून कचरा करतात. महापुरुषांच्या पुतळ्याची समाज कंटकांकडून विटंबना होऊ नये म्हणून व ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयासमोरील सेल्फी पॉइंट गार्डनसाठी सुरक्षारक्षक नेमावेत. गेल्या वर्षी १ डिसेंबर रोजीही निवेदनाद्वारे मागणी केली होती मात्र, अद्याप कार्यवाही झाली नाही. येत्या आठ दिवसात सुरक्षा रक्षक नेमावे, अन्यथा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लोकशाही पद्धतीने आंदोलन करू, असे निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी कनेक्शन; IAS सह DCP, ACP दर्जाच्या महिला अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता, आवडत्या पोस्टिंगसाठी...

Why Gold Prices Falling During War : गुंतवणूकदार चक्रावले! सोन्यात 22 हजार तर चांदीत 58 हजारांची विक्रमी घसरण; खरेदीसाठी हीच योग्य वेळ?

YEIDA: एअरपोर्ट शेजारी स्वतःचं घर घेण्याची सुवर्णसंधी! नवी प्लॉट स्कीम लाँच; पाहा किती आहे किंमत आणि कसा करायचा अर्ज

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

SCROLL FOR NEXT