पिंपरी-चिंचवड

महाल, मंदिरे आणि पौराणिक देखावे

CD

हिंजवडी, ता. १५ : आयटी पार्क हिंजवडी-माण आणि पंचक्रोशीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी मंदिरांच्या प्रतिकृती, पौराणिक देखावे, आकर्षक रोषणाई, फुलांच्या आरास आदी देखावे सादर केले आहेत. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याला मंडळांनी प्राधान्य दिले आहे.


हिंजवडी

राधाकृष्ण महल
श्री छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. मंडळाने भव्य ‘राधा कृष्ण महल’ हा देखावा केला आहे. संदीप साखरे अध्यक्ष आहेत.

गजेंद्र मोक्ष
पंचरत्न चौकातील पंचरत्न तरुण मित्र मंडळाने ३१ व्या वर्षी ‘गजेंद्र मोक्ष’ हा देखावा साकारला आहे. आकाश जांभुळकर अध्यक्ष आहेत. हिंजवडी गावठाणातील जय भवानी मित्र मंडळाने ४२ व्या वर्षी मनोहरी फुलांची सजावट केली आहे. राम साखरे अध्यक्ष आहेत.


महाल, फुलांची सजावट
साखरे वस्तीतील हिंजवडीचा राजा शिवरुद्र मित्र मंडळ ट्रस्टचे आठवे वर्ष आहे. मंडळाने यंदा १२ फुटी भव्य श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापाना भाविकांचे आकर्षक ठरत आहे. महलात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई केली आहे. अजय साखरे यांच्यासह सर्वच सभासद अध्यक्ष आहेत.

भव्य राजवाडा
हिंजवडी गावठाणातील हनुमान तालीम तरुण मंडळाने राजवाड्याचा भव्य देखावा उभा केला आहे. मंडळाचे यंदाचे ४१ वे वर्ष आहे. मल्हारी साखरे हे अध्यक्ष आहेत. हिंजवडी- माण रस्त्यावरील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मित्र मंडळाने फुलांची सजावट केली आहे. मंडळाचे हे २६ वे वर्ष आहे. अनिकेत काकडे अध्यक्ष आहेत.


पर्यावरणपूरक आरास
आदर्शनगर, हिंजवडीतील आदर्श तरुण मित्र मंडळाचे ३० वे वर्ष आहे. पर्यावरणपूरक व आकर्षक फुलांची सजावट केली आहे. तुषार साखरे हे अध्यक्ष आहेत. हुलावळे वस्ती हिंजवडी येथील संकल्प मित्र मंडळाने फुलांची आकर्षक आरास केली आहे. मंडळाचे हे ३२ वे वर्ष आहे. अजिंक्य हुलावळे अध्यक्ष आहेत. हिंजवडीतील शिवतेजनगर येथील शिवतेज मित्र मंडळाचे हे ३५ वे वर्ष आहे. मंडळाने भव्य आणि आकर्षक फुलांची आरास केली आहे. दिनेश जांभुळकर अध्यक्ष आहेत.


श्री क्षेत्र केदारनाथ
हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी चौकातील क्रांती मित्र मंडळाने चारधाम तीर्थ क्षेत्रापैकी एक असलेल्या केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे. त्यावर आकर्षक विद्युत रोषणाई आहे. मंडळाचे हे २९ वे वर्ष आहे. अक्षय जांभुळकर अध्यक्ष आहेत.


माण

डिस्को गाण्यावर डीजे लाईट
माण गावठाणातील शिवतेज मित्र मंडळाचे हे २४ वे वर्ष आहे. डिस्को गाण्यावर डीजे लाईटचा देखावा केला आहे. सूरज पारखी-पाटील अध्यक्ष आहेत.

फुलांची सजावट
माण गावातील सर्वात जुने सार्वजनिक मंडळ असलेल्या जय हनुमान मित्र मंडळ, वडाची तालीमचे यंदाचे ५९ वे वर्ष आहे. मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. प्रसाद पारखी अध्यक्ष आहेत.


मारुंजी

आयफेल टॉवरची प्रतिकृती
मारुंजीतील सरकार चौकातील शिव छत्रपती प्रतिष्ठानचे २४ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने उभारलेल्या भव्य ५५ फूटी पॅरिसमधील आयफेल टॉवरची प्रतिकृती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. त्यावरील भव्य विद्युत रोषणाई देखील सुरेख दिसत आहे. अक्षय बुचडे हे अध्यक्ष आहेत.

नेत्रदीपक रोषणाई
बुचडेनगर, मारुंजी येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित कीर्ती क्लासिक सार्वजनिक गणेश मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा सादर केला आहे.‌ मंडळाचे हे ८ वे वर्ष असून श्रीकांत बुचडे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिवतीर्थनगर, मारुंजी येथील महाराज चौकातील महाराज मित्र मंडळाने १३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. मंडळाने फुलांची सजावट केली आहे. अक्षय बुचडे अध्यक्ष आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT