देव तारी त्याला कोण मारी...
वाकड येथील भीषण अपघातात दोघे जण बचावले
हिंजवडी, ता. २५ : आपल्या सर्वांनाच मृत्यू अटळ आहे. मात्र, काहीजण चालता-बोलता ‘एक्झिट’ घेतात; तर काहीजण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर येतात. असाच काहीसा प्रत्यय मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड येथे रविवारी (ता. २३) आला.
महामार्गावर एमएच ०४-एफझेड ६६९० या आलिशान मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही हेल्मेटसह रस्त्यावर आदळले. यात एकजण रस्त्याच्या डाव्या बाजूला; तर दुसरा समोरील ट्रकच्या चाकाशेजारी जाऊन पडला. दैव बलवत्तर म्हणून की काय, तोदेखील बचावला. या अपघातावेळी सुदैवाने मागून एकही वाहन आले नाही. अन्यथा अनर्थ घडला असता. या घटनेत दुचाकीवरील दिनेश विश्वकर्मा, विकास विश्वकर्मा (दोघेही रा. डेक्कन-पुणे, मूळ उत्तरप्रदेश) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार एका मोटार मालकाच्या कारच्या कॅमेराने रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार ज्ञानेश्वर झोल करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.