पिंपरी-चिंचवड

वाकडमधील आयटी अभियंत्यांचा शनिवारी मूक मोर्चा

CD

वाकड, ता. ४ : ताथवडे आणि मारुंजी परिसरातील वाढते आरएमसी प्लांट, वाढलेले हवेचे प्रदूषण आणि माल वाहतूक जडवाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे अपघातांचा धोका याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीएकडे वारंवार तक्रार करुनही कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ तीसहून अधिक सोसायट्यांमधील सुमारे दोन हजारांहून अधिक आयटी अभियंते शनिवारी (ता. ८) रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढणार आहेत.
ताथवडे - वाकड येथील ताकभाते कॉर्नर जवळील कोहिनूर कोर्ट यार्ड सोसायटीपासून सकाळी ८ वाजा मोर्चाला सुरुवात होईल. कोहिनूर कोर्टयार्ड सोसायटी, एलिट होम्स सोसायटी, झेनिथ सोसायटी, ईशा फूटप्रिंट, शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता, ताकभाते कॉर्नर मार्गे पुढे वाकडकर कॉर्नर येथे त्याची सांगता होणार आहे. शनी मंदिर, इंदिरा स्कूल रस्ता भागातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे असून ती सध्या धोकादायक पातळीवर आहे. परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात सिमेंट मिश्रित धूळ साचल्यामुळे हवेचे प्रदूषण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून श्वसनाचे विकार, ॲलर्जी, डोळ्यांचे त्रास आणि त्वचारोग वाढले आहेत. याशिवाय, रस्त्यांची स्वच्छता न राखल्यामुळे संपूर्ण परिसर अस्वच्छ झाला असल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
या परिसरात १५ ते २० मोठ्या सोसायट्यांमध्ये ५ ते ७ हजार रहिवासी राहतात. त्यांच्या आरोग्यावर हा प्रदूषणाचा मोठा दुष्परिणाम होत आहे. ३ ते ४ मोठ्या शाळा या भागांत असून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याची वाहतूक होत असल्याने वाहनांमधून रस्त्यावर खडी व सिमेंट पडते. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.


मुख्य मागण्या
- दररोज रस्त्यांची दोनवेळा नियमितपणे यंत्राद्वारे पाण्याच्या साहाय्याने साफसफाई करावी
- धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वॉटर स्प्रे’ प्रणाली बसवावी
- सार्वजनिक स्वच्छतेसाठी कडक उपाययोजना कराव्यात
- रस्त्यांवरील खडी आणि सिमेंट गळती रोखण्यासाठी वाहतूकदारांवर जबाबदारी निश्चित करावी
- श्वसनाच्या समस्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवावी
- शनी मंदिर ते मारुंजी रस्त्याच्या दुतर्फा झाडांची योग्य निगा राखली जावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT