पिंपरी-चिंचवड

बेशिस्त चालकांमुळे वाहतुकीचा बट्ट्याबोळ मानकर चौकातील सिग्नल यंत्रणेत वारंवार बिघाड; बेकायदा पार्किंगचाही परिणाम

CD

वाकड, ता. १ : वाकड दत्त मंदिर रस्ता, उत्कर्ष चौकापासून कस्पटे वस्तीकडे जाणारा रस्ता, वाकड गावठाण चौक, मानकर चौक, सावित्रीबाई फुले उद्यान, विशालनगर चौक आदी परिसर सध्या वाहतूक कोंडीचे ‘हॉट स्पॉट’ ठरत आहेत. विविध कारणांमुळे तेथे दोन - दोन तास वाहतूक कोंडी होत आहे.
वाकड, विशालनगर परिसरातील काही चौकांतील सिग्नल यंत्रणा कार्यरत असल्याने बहुधा येथे वाहतूक पोलिस थांबत नाहीत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून त्यापैकी काही चौकांत सिग्नल यंत्रणा बंद पडत आहे. त्यातच वाहतूक पोलिस नसल्याचा गैरफायदा घेत बेशिस्त वाहन चालक उलट दिशेने येऊन उद्दामपणा करतात. अनेकजण मोटारी बेकायदा रस्त्यावरच उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते.
वाहतूक पोलिस येईपर्यंत वाहतुकीचा गुंता होतो आणि लांबपर्यंत रांगा लागून वाहन चालकांना रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे कायमस्वरूपी या चौकात वाहतूक पोलिस नेमण्याची मागणी आता जोर धरत आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसामुळे मानकर चौकात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत तर पावसाच्या भीतीमुळे प्रत्येकजण मोटारीनेच प्रवास करत असल्याने मोटारीच्या रांगाच रांगा लागतात. मात्र, प्रत्येक मोटारीत एकच माणूस असे चित्र सध्या वाकडमधील रस्त्यांवर दिसत आहे. चाकण एमआयडीसीकडे जाणारे मोठमोठे कंटेनर देखील रस्त्यात थांबतात किंवा बिघाड होऊन बंद पडतात.

काय आहेत कारणे ?
- सिग्नल यंत्रणेत वारंवार होणारा बिघाड
- बेशिस्त व उद्दाम वाहनचालक, बेकायदा पार्किंग
- भर रस्त्यात थांबणारे मोठमोठे कंटेनर, लक्झरी बस

‘‘काही वाहन चालकांचा अतिशहाणपणा या समस्येला कारणीभूत ठरत आहे. वाहतूक कोंडी झाल्यास मी स्वतः कोंडी फोडण्यासाठी रस्त्यावर उभा राहतो. मात्र, अनेकांचा तोरा असा असतो, की मी म्हणतोय तेच खरं. ते कोणाचेही ऐकत नाहीत, अशा उद्धट वाहन चालकांमुळे वाकड भागात कोंडी होत आहे. त्यांच्याविरोधात वाहतूक पोलिसांनी प्रखर कारवाईचा बडगा उगारावा.
- महावीर गांधी, सामाजिक कार्यकर्ते

‘‘या भागासह सर्व चौकांत सिग्नल यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे येथील वाहतूक आपोआप पुढे सरकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने सिग्नल यंत्रणा बंद पडत आहे. त्यामुळे ही कोंडी होत आहे. त्यावर उपाय म्हणून या भागात वाहतूक पोलिस, वॉर्डन यांची नेमणूक केली जाईल.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचा अमित शहांना थेट सवाल; पत्र लिहून मागितले उत्तर

आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींबाबतचं विधान चर्चेत, म्हणाल्या, ''पैसे दिले की महिला...''

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

विद्यार्थी आंदोलन झालं, पण आता पुढं काय? कॉकरोच जनता पार्टीनं स्पष्ट केली भूमिका

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

SCROLL FOR NEXT