पिंपरी-चिंचवड

कोयत्याने हल्ला करत दोन्ही हातांचे पंजे तोडले पोलिसांच्या त्रुटीमुळे आरोपींची अटक ठरली बेकायदेशीर ः नातेवाईकांचे आंदोलन

CD

वाकड, ता. २५ : राहुल कनगरे या तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला करत त्याच्या हाताचे पंजे तोडण्यात आले. या गुन्ह्यात वाकड पोलिसांनी तीन आरोपींना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे कारण देत २४ तासांच्या आत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. त्यामुळे वाकड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संतापलेल्या नातेवाईक-नागरिकांनी बुधवारी (ता. २५) वाकड पोलिस ठाण्यात ठिय्या मांडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता
लक्ष्मीबाई बारणे उद्यानाजवळ जुन्या भांडणाच्या रागातून राहुल कनघरे (वय ३०, रा. थेरगाव) या तरुणावर रोहन निमज (वय २०, रा. महादेव कॉलनी, गुजरनगर), शुभम पवार, प्रशांत सकट (वय २२, रा. महादेव कॉलनी, गुजर नगर) या तिघांनी सोमवारी (ता. २३) दुपारी खुनी हल्ला केला. त्यानंतर हवेत कोयता फिरवून ‘आम्ही इथले भाई आहोत. आमचा कोणी नाद करायचा नाही’ असे बोलून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या गंभीर घटनेनंतर पीडित तरुणाच्या आईने वाकड ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, वाकड पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे कारण देत २४ तासात त्यांची सुटका झाली. या घटनेनंतर संताप अनावर झाल्याने राहुलची आई, नातेवाईक तसेच मित्र मंडळी व परिसरातील शेकडो नागरिकांनी पोलिस आयुक्तालयावर ठाण मांडले. यावेळी तेथील अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना भेटू न देता सारवासारव करत पुन्हा वाकड पोलिस ठाण्यात पाठवले. यावेळी उपायुक्त विशाल गायकवाड यांनी जमावाची समजूत काढत आरोपींना पुन्हा अटक करणार असल्याचे आश्वासन दिले.
खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर आणि या हल्ल्यात दोन्ही हाताचे पंजे गमावल्यानंतरही जर आरोपींची अटक बेकायदेशीर ठरत असेल आणि २४ तासांच्या आत गुन्हेगार मोकाट सुटत असतील तर पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याच्या कार्यपद्धतीत त्रुटी राहिल्या का किंवा हे प्रकरण दाबण्यामागे कुणाचा हात आहे का किंवा पोलिसांनी त्यांना जाणून-बुजून मदत केली का ? असा सवाल संतप्त जमावाने केला आहे.


आम्हाला न्याय हवा
वृद्ध आई, पत्नी आणि लहान मुलगी यांची जबाबदारी राहुलच्या खांद्यावर आहे. राहुलचे दोन्ही हाताचे पंजे कापले गेल्याने तो पूर्ण अधू झाला असून, अजूनही तो मृत्यूशी झुंज देत आहे. तर त्याच्यावर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठीच्या खर्चाचा भला मोठा डोंगर समोर उभा आहे. राहुलचे मित्र मंडळी जमेल तेवढी मदत करून हातभार लावत आहेत. एवढे झाले असतानाही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांनी योग्य कार्यवाही करून, गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देत आम्हाला न्याय द्यावा, अशी अशी मागणी करत राहुलच्या आईने आणि पत्नीने पोलिस ठाण्यात टाहो फोडला.

‘‘कायदेशीर सर्व प्रक्रिया पार पाडून खुनाचा प्रयत्न हाच गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, अटकेचे मूळ कारण योग्य नसल्याचे कारण देत त्यांची सुटका केली. मात्र अटकेचे मूळ कारण न्यायालयाला देऊन आरोपींना पुन्हा अटक केली जाणार आहे
- विशाल गायकवाड
पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन

फोटोः 8938

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

SCROLL FOR NEXT