पिंपरी-चिंचवड

वाकडचा भुमकर चौक ‘बॉटलनेक’

CD

वाकड ः हिंजवडी आयटी पार्कमधील अनेक कंपन्यांतील कामगार दररोज सायंकाळी पाचच्या सुमारास टप्प्याटप्प्याने सुटतात. भूमकर चौकातील पूना बेकरी ओलांडली की वाहतूक कोंडी सुरू होते. सोमवारी सायंकाळीही तब्बल अर्धा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुयारी मार्गातून जाताना वाहनचालकांची अक्षरशः दमछाक होते. जागोजागी मारावे लागणारे ब्रेक, कर्णकर्कश हॉर्नचे आवाज, दोन-दोन पावलांवर दहा-दहा मिनिटे थांबण्याचा नाइलाज, यामुळे सर्वांचीच घुसमट सुरू होते.

कोंडीची कारणे
- प्रशस्त रस्ते पण, भुयारी मार्ग अतिशय अरुंद
- बॉटलनेक व बेशिस्त वाहनचालकांमुळे चारही बाजूने कोंडी
- भुमकर चौक भुयारी मार्गात साठणारे पाणी व खड्डे
- चौकातील अनधिकृत रिक्षास्टँड, पार्किंग

उपाययोजना
- भूमकर चौक भुयारी मार्ग किमान आठ पदरी करावा
- काळाखडक कोपऱ्याजवळील वळणाऱ्या वाहतुकीसाठी एकेरी मार्ग करावा
- पावसाच्या पाण्याचा निचरा करणे व खड्डे बुजविणे
- काळाखडक चंद्र माऊली गार्डन चौकात बेशिस्त पार्किंग हटविणे

आयटी पार्क हिंजवडीतून वाकडकडे येताना फारसे काही वाटत नाही. मात्र, भुमकर चौक पार करणे म्हणजे मोठ्या अग्निदिव्यासारखे वाटते. भुमकर चौक ओलांडणे आमच्यासाठी सर्वांत मोठी परीक्षा आहे. चौकातून पलीकडे जाताना किमान अर्धापाऊण तास नक्कीच लागतो
- रणजित गडदे, वाहनचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ASIA CUP TROPHY UPDATE : माझ्या परवानगीशिवाय ट्रॉफी दिली, तर...! पळकुट्या मोहसिन नक्वीचा माजुर्डेपणा

Mumbai News: बालगुन्हेगारीचा आलेख खाली! नागपूर, पुण्यापेक्षा सर्वाधिक लोकसंख्येच्या मुंबईत प्रमाण कमी

Latest Marathi News Live Update : धावत्या पीएमपीएमएल इलेक्ट्रिक बसला अचानक आग

Illegal Jungle Safari : नियमांना बगलचा खेळ, जंगल सफारीचा मेळ; जिल्ह्यात दीडशेंवर गाड्या; अनधिकृत व्यावसायिकतेमुळे वनसंपदेला धोका

"पहिल्यांदा असा धीट पेशंट पाहिला" लग्नानंतर होईलच प्रेम फेम अभिनेत्रीने सांगितला कॅन्सर ऑपरेशनचा अनुभव

SCROLL FOR NEXT