पिंपरी-चिंचवड

डांगे चौक-हिंजवडी रस्त्याचा श्वास अडकला

CD

बेलाजी पात्रे : सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. ११ : भूसंपादनाअभावी अनेक ठिकाणी रखडलेले रुंदीकरण, निमुळता झालेला भुमकर चौक भुयारी मार्ग, काळाखडक झोपडपट्टीच्या अतिक्रमणांचा विळखा यामुळे डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावर वाहतूक कोंडी गंभीर समस्या बनली आहे. भुमकर चौक काळाखडक रस्त्यावरील कोंडीत आयटीयन्स, स्थानिक आणि वाहनचालकांचा रोजच श्वास अडकत आहे. प्रामुख्याने रखडलेले रस्ता रुंदीकरण येथील वाहतूक समस्येचे मूळ बनले आहे.

भुमकर चौक हे हिंजवडी आयटी पार्क आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणारे महत्त्वाचे ‘जंक्शन’ आहे. हिंजवडी आयटी हब आणि औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ सातत्याने वाढत आहे. हा परिसर औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांचा मध्यवर्ती भाग आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहने, विशेषतः आयटी कर्मचारी, औद्योगिक कामगार आणि स्थानिक रहिवाशांची ये-जा असते. रस्त्याची रुंदी आणि खराब अवस्था यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
भुमकर चौक ते काळाखडक मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे स्थानिक रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ‘पीक अवर्स’मध्ये या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. यामुळे प्रवासाचा वेळ वाढून इंधनाचा अपव्यय होतो. शिवाय कर्मचाऱ्यांचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो.


प्रस्तावित उन्नत रस्ता अजूनही चर्चेतच
रावेत ते नऱ्हे या २४ किलोमीटरच्या सहापदरी उन्नत मार्गाचे (एलिव्हेटेड कॉरिडॉर) नियोजन आहे. यामुळे भुमकर चौक आणि परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. रावेत ते वाकड या दरम्यान सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण प्रस्तावित आहे. महामार्ग प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते संयुक्तपणे करत आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ठोस कार्यवाही होऊ शकली नाही.

भुमकर सर्कलचे घोडे कोठे अडले?
सुमारे २००८ मध्ये भुमकर चौकात भुयारी मार्ग झाल्यानंतर पुढे ‘वाय जंक्शन’जवळ गोलाकार चौक (सर्कल) करण्याचे प्रस्तावित होते. यामुळे वाहतूक कोंडी सुटणार होती. मात्र, मोबदल्याअभावी शेतकऱ्यांनी जमिनी न दिल्याने तसेच अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा न झाल्याने हा प्रकल्प कागदावरच आहे.

रस्ता रुंदीकरणासाठी पाठपुरावा सुरू असतो. मात्र, त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे कोंडीत भर पडत आहे. रस्ता विस्तारीकरण आणि काळाखडक परिसरातील अतिक्रमणे हटविल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल.
- सुनील पिंजन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड

वाकड गावातून सर्वाधिक करभरणा केला जातो. तरीही, प्रत्येक चौकात कोंडी होते, ही दुर्दैवी बाब आहे. भुमकर चौक-काळाखडक मार्गावर कोंडी ही रोजची समस्या बनली आहे. हिंजवडी आयटी पार्क हे आर्थिक केंद्र आहे. पण, कोंडीमुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.
- सागर भुमकर, स्थानिक रहिवासी, वाकड

महापालिका हद्दीतील बहुतांश काम पूर्ण आहे. आता पंडित पंपासमोर, मेट्रो कास्टिंग यार्डजवळ ताथवडे व काळाखडक झोपडपट्टी परिसरात रस्ता रुंदीकरण बाकी आहे. भूसंपादनाअभावी ते बाकी आहे. रुंदीकरण पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण बिभाग

भूसंपादनाला गती देऊन रस्ता रुंदीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. भुमकर चौक भुयारी मार्गाचा विस्तार, काळाखडक मार्गावर रखडलेले रुंदीकरण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. प्रशासनाने वाहतूक नियोजन सुधारून ही समस्या सोडवण्याची गरज आहे.
- मोहित मंगल, आयटी कर्मचारी

शहराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी रस्ता रुंदीकरण गरजेचे आहे. प्रकल्पांना गती देऊन आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारणे आवश्यक आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवास सुलभ होईल आणि परिसरातील जीवनमान सुधारेल. प्रशासनाने स्थानिकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- रोहन टिकोळे, आयटी कर्मचारी

WKD25A09011

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT