पिंपरी-चिंचवड

हिंजवडी आयटी पार्कच्या कुशीमधील ‘प्लॅटिनम’

CD

माझी सोसायटी - माझे उपक्रम
प्लॅटिनम पार्क सोसायटी, माण-हिंजवडी रस्ता


बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी, ता. १२ : जगद्विख्यात स्व. राजीव गांधी इन्फोटेक पार्कच्या कुशीत वसलेली माण-हिंजवडी रस्त्यावरील प्लॅटिनम पार्क सोसायटी आधुनिक सुख-सुविधांनी नटलेली असून ‘ए’ आणि ‘बी’ विंग ही छोट्या भारताची प्रतीक बनली आहे. पावसाळी जलपुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाणी शुद्धीकरण (एसटीपी) प्रकल्पांद्वारे पाण्याच्या बचतीकडे खास लक्ष दिले जात आहे.
प्लॅटिनम पार्क सोसायटीत सुमारे १८७ सदनिका आहे. माहिती तंत्रज्ञानासह इतरही अनेक नोकरी अथवा उद्योग करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत विविध जाती-धर्माची कुटुंब इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.
या सोसायटीचे खास वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या सण-समारंभांच्या निमित्ताने राबवले जाणारे विविध सांस्कृतिक उत्सव, कार्यक्रम होय. या सण-उत्सवानिमित्त बालगोपाळांसह सर्व कुटुंबियांना मिळणारी खास पर्वणी म्हणजे नव्या दमाने कामाला लागण्यासाठी लागणारी नैसर्गिक उर्जाच आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आणि सणांच्यावेळी एकत्रित स्नेहभोजनाचे आयोजन केले जाते. सदनिकाधारकांमध्ये अधिक मजबूत बंध निर्माण होईल आणि एकतेच्या बळावर आणि कुटुंबाच्या भावनेने पुढे जाता येईल, याचे नेहमी प्रयत्न केले जातात.

सुरक्षा, स्वातंत्र्याला प्राधान्य
सोसायटीच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी समितीने विशेष उपाययोजना केल्या आहेत. सभासदांचे व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी मेहनत घेतली जाते. २४ तास सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्हीचे सुरक्षा कवच सोसायटीला प्रदान करण्यात आले आहे.

पर्यावरण संवर्धनास पुढाकार
पर्यावरणाचे रक्षण व्हावे, त्याची कुठल्याही प्रकारे हानी होऊ नये यासाठी सोसायटीतील प्रत्येक सभासदाकडून विशेष काळजी घेतली जाते. त्यासाठी विविध उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. वृक्षारोपण मोहीम राबवली जाते. सोसायटी परिसरात वृक्षारोपण केले जाते. कचऱ्याचे विलगीकरण केले जाते.

उद्यान, जिमची सुविधा
सोसायटीतील सभासदांच्या शारीरिक व मानसिक सदृढतेसाठी विविध सुख- सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. भव्य आणि आधुनिक जिमचा शेकडो सभासद लाभ घेतात. प्रशस्त क्लब हाउसमध्ये बैठका, व्यक्तिगत व सार्वजनिक कार्यक्रम सोहळे पार पडतात. वेळोवेळी आरोग्य तपासणी शिबिरही भरविण्यात येते.

सण - उत्सवांची रेलचेल
सोसायटीत सर्वधर्मीय कुटुंबीयांना समान संधी आणि वाव आहे. सर्व सण-उत्सव एकत्रितपणे आणि आनंदाने साजरे केले जातात. गणेशोत्सव, कृष्ण जन्माष्टमी, होळी, रंगपंचमी, दसरा-दिवाळी, नाताळ, स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन असे विविध सण अतिशय उत्साहात साजरे केले जातात.

गणेशोत्सवाचे भव्य आयोजन
दरवर्षी गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नृत्य, गाणी, पथनाट्य, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात सर्व सभासद अत्यंत हिरीरीने सहभागी होतात. गतवर्षी सोसायटीतील बालगोपाळांना घेऊन पौरवी साठे व संपदा साठे या दोघींनी गणेशजन्म कथेचा उत्तम नाट्याविष्कार गणेशोत्सवात सादर केला. सोसायटीतील सदस्यांनी हा नाट्याविष्कार माण-हिंजवडी सांस्कृतिक मंडळाच्या नवरात्र उत्सवातही सादर केला.

पालखी सोहळ्याचा उत्साह
राज्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संतपरंपरेचे अधिष्ठान असणाऱ्या पंढरीच्या वारीनिमित्त दरवर्षी सोसायटीत प्रतिकात्मक वारी, पालखीचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सर्व सभासद आपापल्या प्रांतातल्या पारंपरिक वेशभूषेत व ज्ञानोबा - तुकारामांच्या
गजरात उत्साहाने सामील होत असतात.

दर आठवड्याला निसर्गभ्रमंती
दैनंदिन जीवनातील धावपळीतून थोडा वेळ काढून आठवड्याच्या शेवटी निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी सोसायटीतील विविध वयोगटांतील सदस्य एकत्र येऊन परिसरातील डोंगररांगा, धबधबे आणि निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेतात. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या उत्साहाने हा उपक्रम अधिक रंगतदार बनतो आहे. निसर्गाशी नाते दृढ करणारा आणि मानसिक-शारीरिक आरोग्य वाढवणारा हा निसर्गभ्रमंतीचा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचा संकल्प रहिवाशांनी केला आहे.

आमच्या सोसायटीमध्ये विविध प्रकारची झाडे आहेत. त्यांनी आम्हाला एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते. हीच उर्जा आम्ही आमच्या दैनंदिन आयुष्यात बाळगून सगळ्यांसोबत आनंद, प्रेमात आणि उत्साह राहतो.
- मंगेश गायकवाड, रहिवासी, प्लॅटिनम पार्क


आधुनिक काळातील एकाकीपणाच्या नियमांना आव्हान देत आपला समुदाय एका विस्तृत कुटुंबाच्या रूपात भरभराटीला येतो. येथे एकता केवळ उत्सवांसाठी नाही; ती आपल्या दैनंदिन जीवनाचा सततचा धागा आहे. जो सर्वांसाठी आपलेपणा, जबाबदारी आणि समर्थनाची सखोल भावना वाढवतो.
- हरिनी कंडाला, रहिवासी, प्लॅटिनम पार्क सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT