पिंपरी-चिंचवड

दत्तवाडीमधील स्मशानभूमीजवळ महसूल सप्ताहाअंतर्गत वृक्षारोपण

CD

हिंजवडी, ता. ३ : दत्तवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील स्मशानभूमी परिसरात महसूल सप्ताह अंतर्गत तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. ३) सकाळी वृक्षारोपण आणि रस्ता मोकळा करणे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनासोबतच सामुदायिक सहभाग आणि स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
नेरे - दत्तवाडीत तिसऱ्या दिवशी पाणंद रस्ते मोकळे करून दुतर्फा वृक्षारोपण या संकल्पने अंतर्गत वरील उपक्रम पार पडला. मंडल अधिकारी विष्णू भोसले यांच्या हस्ते वृक्षारोपणास प्रारंभ झाला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देताना झाडे लावण्यासोबतच नियमित काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महसूल अधिकारी सच्चिदानंद महामुनकर, तलाठी हनुमंत चांदेकर, नवनाथ मुऱ्हे, अमोल ढिगळे, स्वप्नील नरखेडेकर, पोलिस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप जाधव पाटील, पोलिस पाटील दीपाली जाधव पाटील, सरपंच सचिन जाधव, मुख्याध्यापिका अरुणा यशवंते, रामदास मेमाणे, राहुल जाधव, गणेश शिंदे, सुग्रीव कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्तवाडी येथील स्मशानभूमी परिसरात फळझाडे, औषधी वनस्पती आणि डेरेदार झाडे लावण्यात आली. रस्त्यावरील खड्डे, अडथळे दूर करून परिसर स्वच्छ सुरक्षित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

किती क्युट! शशांक केतकरची लेक सेम टू सेम त्याच्यासारखीच, नाक, डोळे पाहून नेटकरी म्हणाले... Viral Video

Mumbai Doctor Case : 'तुझा पुरुषी अहंकार आता तरी..'; मुंबईतील डॉक्टर तरुणीने घेतला गळफास, 6 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय? स्तुतीसोबत असं का वागला प्रियकर फैजुल खान?

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

SCROLL FOR NEXT