पिंपरी-चिंचवड

ओढ्यावरील पुलासाठी जांबेतील तरुणांचा ‘आत्मनिर्भर’ पॅटर्न

CD

बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
हिंजवडी, ता. २० : सुमारे ६० कुटुंबांशी व सव्वाशे लोकांचा संपर्क तोडणारा जांबे गावातील तो जुना ओढा. अलीकडे सर्वांसाठी डोकेदुखी ठरत होता. मात्र, गावातील तिघा तरुणांनी चुटकी सरशी ही समस्या सोडवली. कोणत्याही शासकीय निधी, यंत्रणा अथवा सरकारी बाबुंची वाट न पाहता स्वखर्चातून ओढ्यावर नलिका टाकून त्याची दुरुस्ती केली. त्याद्वारे या तरुणांनी रस्त्याची समस्या सोडवून आत्मनिर्भर ‘जांबे पॅटर्न’ सर्वांना दाखवून दिला आहे.
गावातील वैभव शितोळे, मयूर कानपिळे, नीलेश गायकवाड या तरुणांनी आदर्श कामगिरीद्वारे ग्रामस्थांची मने जिंकली. आयटी परिसरातील जांबे गावातील वाजे वस्तीकडे जाणारा ओढा आहे. पावसामुळे या ओढ्यावरील रस्ता पाण्याखाली गेला होता. त्याने ७० कुटुंबे, काही शेतकरी, भाडेकरू, प्लॉटिंगमध्ये नव्याने आलेले घर मालक अडचणीत आले होते. थोडासा पाऊस झाला की, ग्रामस्थांचे दळणवळण ठप्प होत असे. नागरिकांना घरी व शेतात जाणे कठीण झाले होते. अनेक वाहने पाण्यात बंद पडून नुकसान होत होते. याबाबत ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या.
त्यावर उपाय करण्यासाठी वैभव शितोळे, मयूर कानपिळे, निलेश गायकवाड यांनी मुळशी तहसीलदारांशी चर्चा केली. असता पाऊस उघडताच तत्काळ काम करण्याचे आश्वासन मिळाले. मात्र, पाऊस उघडायची व निविदा निघायची वाट न बघता त्यांनी स्वखर्चातून ओढ्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरवात केली. भर पावसात दोन जेसीबी, एक पोकलेन, एक क्रेन, डम्पर व पाच मजुरांच्या साहाय्याने ओढ्यावरील रस्ता खोदून, पाणी काढून टाकण्यात आले. ८ फूट लांब व पाच फूट व्यास असलेले सहा नलिका व त्यावर मुरुम टाकून २४ फूट रुंद रस्ता करण्यात आला. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांकडून या तरुणांचे कौतुक होत आहे.


जांबे गावच्या मातीने आम्हाला वाढविले आणि घडविले. त्या मातीसाठी व गावातील लोक, समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून आम्ही तिघांनी एकत्र येत ही समस्या कायमची सोडविण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला.
- वैभव शितोळे

ग्रामस्थांचा घराबाहेर मुक्काम
गेल्या दीड महिन्यांपूर्वी झालेल्या सायंकाळी झालेल्या मोठ्या पावसात ओढ्याला तब्बल चार ते पाच फूटांपर्यंतचे पाणी वेगाने वाहू लागले. त्यामुळे वस्तीचा संपर्क तुटला. त्यादिवशी कामानिमित्त गावाबाहेर गेलेले कामगार, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना त्या रात्रीचा मुक्काम नाईलाजाने पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळी व हॉटेलमध्ये करावा लागला.

WKD25A09344

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Hashmi: इमरान हाशमीचा ठाकरे गटात प्रवेश! निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना झटका, मिरा भाईंदरवर लक्ष!

Nashik Accident : भीषण! नाशिक-गुजरात महामार्गावर कार-ट्रकची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

Kolhapur Fraud Tantrik : कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर..., चुटकी वाजवून भूतबाधा करणाऱ्या मांत्रिकाचा कारनामा उघड; जिल्ह्यावर वचक ठेवायचां प्रयत्न...

Type 5 Diabetes Global Recognition: मधुमेहाच्या नव्या प्रकार; ‘टाइप ५’ मधुमेहाला आता जगभर अधिकृत मान्यता

राग, निराशा अन्‌ हतबलता वाढतेय! ISL सुरू करण्यासाठी भारतीय फुटबॉलपटूंची आर्त हाक...

SCROLL FOR NEXT