पिंपरी-चिंचवड

अबब... सात किलोंचा नैवेद्याचा लाडू तोही ६५ हजारांना !

CD

हिंजवडी, ता. ७ : मारुंजीतील श्रीराम प्रतिष्ठान संचलित कीर्ती क्लासिक सार्वजनिक गणेश मंडळाने यंदाही आपली अनोखी परंपरा कायम ठेवत गणरायाला तब्बल सात किलोंचा नैवेद्याचा लाडू अर्पण केला. सातव्या दिवशी लिलावात हा लाडू तब्बल ६५ हजार रुपयांना विकला गेला. त्यामुळे भक्तांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंडळ दरवर्षी भक्तिमय आणि भव्य आयोजनासाठी प्रसिद्ध आहे. यंदाही मंडळाने गणपतीला अर्पण करण्यासाठी सात किलोचा भोग लाडू तयार केला. हा लाडू केवळ त्याच्या आकारामुळे नव्हे; तर त्यामागील भक्ती आणि श्रद्धेमुळेही विशेष ठरला. सातव्या दिवशी सत्यनारायण महापूजेच्या मुहूर्तावर या लाडूचा लिलाव आयोजित करण्यात आला. लिलावात सहभागी झालेल्या भक्तांनी उत्साहाने बोली लावली आणि अखेरीस हा लाडू ६५ हजार रुपयांच्या विक्रमी किमतीला विकला गेला. या लिलावाचे श्रीकांत बुचडे हे मानकरी ठरले.
बुचडे यांनी लिलावात सहभाग घेऊन गणराया प्रती श्रद्धा आणि भक्ती व्यक्त केली. या लिलावातून मिळालेली रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. मंडळाची ही परंपरा केवळ भक्तीपुरती मर्यादित नसून ती सामाजिक बांधिलकी आणि एकतेचे प्रतीक बनली आहे. दरवर्षी शेकडो भक्त मंडळाच्या गणेशोत्सवात सहभागी होत असतात. लाडूच्या लिलावासारख्या अनोख्या उपक्रमांमुळे हा उत्सव अधिकच अविस्मरणीय ठरतो.

गेल्या दोन वर्षांपासून प्रसादाच्या लाडूचा लिलाव करण्याची प्रथा प्रतिष्ठानने सुरू केली आहे. लिलावाच्या पैशातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवले जातात. गेल्या वर्षीच्या लिलावातील पैशांमधून श्रीराम चौक व परिसरात सौर उर्जेवरील पथदिवे बसविण्यात येणार आहेत.
- ॲड. संगीता बांदल, सचिव, श्रीराम प्रतिष्ठान, मारुंजी
WKD25A09446

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Social Media Ban : नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदीचं नवीन कारण आलं समोर, कोणते अ‍ॅप सुरू अन् कोणते बंद?

घरच्यांच्या विरोधात जाऊन गायिकेने केलेलं 20 वर्षं मोठ्या व्यक्तीबरोबर लग्न; घरगुती हिंसेची शिकार आणि बहिणींमधील भांडण

Asia Cup Live Streaming: आशिया कप जिओ हॉटस्टारवर नाही दिसणार; मग IND vs PAK मॅच कुठे पाहता येणार?

न्यायालयाला राजकारणाचा आखाडा बनवू नका, नेता असाल तर कातडी जाड हवी; सुप्रीम कोर्टानं भाजपलाच झापलं

Asia Cup 2025 : संजू सॅमसनला टॉप ऑर्डरवर खेळवा, शुभमन गिलसाठी दुसरी जागा शोधा...; Ravi Shastri यांचा गौतम गंभीरला सल्ला

SCROLL FOR NEXT