पिंपरी-चिंचवड

संघ शाखेतून देशभक्तांची जडणघडण ः कुलकर्णी

CD

वाकड, ता. २९ : ‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कातील व्यक्तीला देशभक्ती, समर्पण, त्याग, राष्ट्रनिष्ठा शिकायला मिळते. स्वयंसेवकांच्या सहवासात अनेक मूल्ये आपोआप रुजली जातात. संस्कार करून व्यक्तीला निस्सीम देशभक्त घडविण्याचे ठिकाण म्हणजेच संघाची शाखा होय,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, थेरगावनगर, हिंजवडी गट यांच्यावतीने विजयादशमीनिमित्त थेरगावामधील कै. मोरू महादू बारणे उद्यानात आयोजित संघ शताब्दी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी थेरगाव विभागाचे कार्यवाह विजय नेवसे, सिद्धेश्वर बारणे, काळुराम बारणे, वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी, करिष्मा बारणे, सनी बारणे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कुलकर्णी यांनी संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी, संघाचा मागील शंभर वर्षातील विकास व कार्य सांगताना वेगवेगळे आयाम व सेवा कार्यांची माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी शस्त्र पूजन केले. दीडशेहून अधिक स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. संघ संचलनाचे व भगव्या ध्वजाचे थेरगाव येथील नागरिकांनी जागोजागी पुष्पवृष्टी करत उस्फूर्त स्वागत केले.
WKD25A09563

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पाचोर्‍यातील कृष्णापुरीत घर पडून १ ठार, २ जखमी

SCROLL FOR NEXT