पिंपरी-चिंचवड

वाकड-बालेवाडी पुलाचे काम वेगाने

CD

वाकड, ता. ३१ : जमिनी ताब्यात न आल्याने वाकड-बालेवाडी पूल दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, मोबदल्यासंदर्भातील तिढा सुटला असून उर्वरित किरकोळ भूसंपादन सामोपचाराने केले जाणार आहे. त्यामुळे या जोड रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांना जोडणारा हा पूल मुळा नदीवर सुमारे ३४ कोटी रुपये खर्चून उभारला जात आहे. बालेवाडीकडील पुलाला जोडणाऱ्या संपूर्ण ३० मीटर जोड रस्त्याच्या रखडलेल्या कामापैकी २० मीटर अंतरावरील रस्ता रुंदीकरण, पादचारी मार्ग आणि प्रकाश योजनेचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हा पूल सुरू झाल्यास दोन्ही शहरांतील संपर्क सुलभ होणार असून, अत्यंत जलद, सुरक्षित प्रवास होणार आहे. त्यामुळे आयटी आणि निवासी क्षेत्रांना संजीवनी मिळणार आहे.
हा प्रकल्प २०१३ मध्ये मंजूर झाला आणि २०१८-१९ पर्यंत बांधकाम पूर्ण झाले. मात्र, भूसंपादनाच्या अडचणींमुळे तो अद्याप पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. जुलैमध्ये येथील एका जागा मालकाने ताबा दिल्याने कामाला गती मिळाली आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत तडजोडीची सकारात्मक बोलणी सुरू आहे.


वाहतुकीला दिलासा
हा पूल बंद असल्याने नागरिकांना वाकडहून बालेवाडी किंवा औंधमार्गे जाण्यासाठी वळसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. पूल सुरू झाल्यास पिंपरी चिंचवड भागातील वाहतूक कोंडी कमी होईल. हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी बाणेर-बालेवाडीकडे जाणे सोपे होईल. सकाळ-संध्याकाळच्या पीक आवर्समध्ये कोंडी कमी होईल.

जनतेच्या पैशांतून उभारलेला हा पूल केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे अपूर्ण आहे. तो पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रखर लढा दिला. न्यायालयातही याचिका दाखल केली. पूल सुरू झाल्यास विद्यार्थी, कर्मचारी, रहिवासी आणि व्यावसायिकांसाठी हा मोठा दिलासा आहे.
- अरुण देशमुख, रहिवासी, वाकड

जोड रस्त्यातील मोठा टप्पा आम्ही पार करत आहोत. उर्वरित जागा ताब्यात घेण्याचीही प्रक्रिया सुरू आहे. अन्य शेतकऱ्यांसोबत आर्थिक, टीडीआर, एफएसआय स्वरुपात मोबदला देण्याबाबत सकारात्मक बोलणी सुरू आहेत. भू-संपादन कायाद्यान्वये मोजणी झालेली आहे. प्रकल्प लवकरच पूर्ण होईल.
- सुधीर चव्हाण, प्रभारी मुख्य अभियंता, पुणे स्मार्ट सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Financial Scam : अमेरिकेत मोठा आर्थिक घोटाळा! भारतीय वंशाच्या ‘CEO’वर तब्बल ४००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Mumbai Local Megablock: महिन्याच्या पहिल्याच रविवारी खोळंबा, तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; अनेक लोकलवर परिणाम

Asian Youth Games 2025: चाळीतून उंच भरारी! पुण्याच्या चंद्रिकाने बहरीनमध्ये मुष्टियुद्धात सुवर्णपदकावर कोरले नाव

Purandar Airport : भूसंपादनासाठी हवे पाच हजार कोटी, प्रस्तावित पुरंदर विमानतळ; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या प्रसिद्ध कलाकार पद्मविभूषण तीजनबाई यांच्या कुटुंबाशी संवाद साधला

SCROLL FOR NEXT