पिंपरी-चिंचवड

वडगाव-लोणावळा मार्गावर ‘लॅंड ऑफ ड्रीम्स’

CD

हिंजवडी, ता. ८ : ‘क्रिसाला डेव्हलपर्स’ने वडगाव-लोणावळा ग्रोथ कॉरिडॉरमध्ये ६३ एकरांवर ‘लॅंड ऑफ ड्रीम्स’ ही बाली-प्रेरित अत्याधुनिक टाउनशिप उभी करणार असल्याची घोषणा केली. हा प्रकल्प पुण्याच्या सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या आर्थिक पट्ट्यात येत असून, येथे १,५०० ते ४,००० चौ. फूट आकाराचे क्लिअर टायटल एन.ए. प्लॉट्स उपलब्ध होतील.

वाकड येथील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियमपासून अवघ्या ३० मिनिटांवर हा प्रकल्प आहे. हिंजवडी, तळेगाव व लोणावळा या प्रमुख आयटी-औद्योगिक केंद्रांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने गुंतवणुकीस अनुकूल मानला जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व जुन्या महामार्गाची जवळीक, तळेगाव-चाकण-भोसरी एम आयडीसीशी थेट जोडणी हे या कॉरिडॉरचे बलस्थान आहे. पुढील काही वर्षांत पुणे-लोणावळा रेल्वे विस्तारीकरण, मिसिंग लिंक, आउटर रिंग रोड, बुलेट ट्रेन, मेट्रो विस्तार, नवी मुंबई व पुरंदर विमानतळ असे मोठे पायाभूत प्रकल्प पूर्ण होणार आहेत. त्यामुळे २०२५ ते २०३३ दरम्यान या भागात अडीच पट मूल्यवृद्धी अपेक्षित आहे. प्रकल्पात ५.७६ एकर मनोरंजन क्षेत्र, एक लाख चौरस फूट जीवनशैली केंद्र ‘क्लब ४१’, रिसॉर्ट-स्टाइल स्विमिंग पूल, स्पा, मिनी थिएटर, वेलनेस झोन, आयुर्वेदिक डीटॉक्स सेंटर आदी ५० हून अधिक प्रीमियम सुविधा असतील.


लॅंड ऑफ ड्रीम्स हा केवळ प्लॉट प्रकल्प नव्हे, तर भविष्यकाळासाठी सिद्ध गुंतवणूक आणि उच्च दर्जाची जीवनशैली आहे.”गेल्या १३ वर्षांत क्रिसालाने २३ लाख चौ. फूट प्रकल्प पूर्ण केले असून सध्या ६३ लाख चौ. फूट बांधकाम प्रगतिपथावर आहे. कंपनीने यापूर्वी क्रिसला हिरानंदानी टाउनशिपचा १०५ एकरांचा पहिला टप्पा एकाच दिवसात विकला होता.
- आकाश अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, क्रिसाला डेव्हलपर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT