पिंपरी-चिंचवड

भाजप उमेदवारांचा सोसायट्यांमध्ये संवाद

CD

वाकड, ता. ११ : निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आल्याने पिंपळे निलख-कस्पटेवस्ती-विशालनगर प्रभाग २६ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे या उमेदवारांनी रविवारच्या सुट्टीचा दिवस गाठत अक्षरशः प्रभाग पिंजून काढला. त्यामुळे भाजप पॅनेलच्या प्रचारात रंगत आली आहे.
उमेदवारांनी हाउसिंग सोसायट्यांमध्ये बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. बैठकांमध्ये सोसायटीधारकांनी उत्साहात सहभाग नोंदवला. जनतेचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता आमच्या पॅनेलचा उत्साह द्विगुणित झाला आहे, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या स्वप्नातील विकासाचे व्हीजन प्रत्यक्षात उतरविण्यासाठी बहुमताने भाजपच्या पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन यावेळी कारण्यात आले.
दौऱ्यादरम्यान बेला विस्टा, माउंटवर्ट ओयस्टेरा, प्रेस्टिन ग्राईनडर, सुकासा, आरके लाइफ स्पेस, नंदन इम्परिया, कोस्टा रिका, कॅप्रिसिओ, माउंट वर्ट सिव्हिल, लॉरेल, कॅलीस्टो, मी कासा बेला, ओझोन स्प्रिंग या सोसायट्यांमध्ये बैठका झाल्या. यावेळी यंत्राद्वारे कशाप्रकारे मतदान करायचे याचे प्रात्यक्षिक दाखवत शंकाचे निरसन करण्यात आले. चारही उमेदवारांनी आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे अभिवचन देत जाहीरनामा प्रसिद्ध केला.


मुबलक पाणी, सांस्कृतिक भवनचे नियोजन
जाहिरनाम्यामध्ये अतिक्रमणमुक्त पदपथ आणि रस्ते, प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हरितकरण, प्रभागाची स्वच्छता व सुशोभीकरणावर भर, मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा, काळेवाडी फाटा परिसरात आरक्षण विकसित करून त्या ठिकाणी खेळाचे मैदान, उद्यान, विरंगुळा केंद्राची उभारणी, सांस्कृतिक भावनाचे नियोजन आदि मुद्द्यांचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT