पिंपरी-चिंचवड

सायकलपटूंचे शिस्तबद्ध वातावरणात स्वागत

CD

वाकड, ता. २० ः पुणे ग्रँड चॅलेंज सायकल स्पर्धेतील सायकलपटूंचे शिस्तबद्ध वातावरणात स्वागत करण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास थेरगावातील डांगे चौकातून स्पर्धक मार्गस्थ होणार असल्याने थरार अनुभवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दोन किमीपर्यंत बालगोपालांसह सर्वांनीच गर्दी केली होती. त्यामुळे क्रीडाप्रेमींसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधले गेले.
दुपारी दोन वाजल्यापासूनच मार्गावर उत्साहाचे वातावरण होते. सर्वांची उत्कंठा ताणली जात होती. अनेक मुले सायकलपटू केव्हा येणार असे पोलिसांना विचारत होते. तुमच्यामुळे आम्हाला सायकलपटू दिसत नाही, तुम्ही बाजूला व्हा असेही काहीजण पोलिसांना सांगत होते. सायकलींचा सुसाट ताफा दाखल झाला होताच सर्वांनी एकच जल्लोष केला. अनेक स्पर्धकांनी प्रेक्षकांचा मान राखत हात उंचावून अभिवादन केले.
मार्गावर वाहतूक नियंत्रण पोलिस, स्वयंसेवकांचा समन्वय होता. हिंजवडी, आयटी पार्क परिसरासह शहरातील प्रमुख मार्गांवरून स्पर्धा जात असताना सायकलिंगबाबत वाढलेली जनजागृती दिसून आली. पर्यावरणपूरक वाहतूक, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश या स्पर्धेतून प्रभावीपणे पोहोचला.

कोंडीने दमछाक
शर्यत मार्गावर कुठलाही अडथळा होऊ नये म्हणून डांगे चौक आणि परिसरातील सर्वच प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते त्यामुळे वळसा मारून पर्यायी मार्गांवर पोचूनही तो देखील बंद असल्याने सर्वांना मोठा मनस्ताप होत होता. जिकडे जाईल तिकडे रस्ता बंदची परिस्थिती असल्याने इच्छितस्थळी जाताना सर्वांचीच मोठी दमछाक झाली मुख्य रस्ता वगळता अन्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

रुग्णांना पोलिसांची मदत
सायकल शर्यत मार्गावरील दत्तनगर परिसरात दोन्ही बाजूचा रस्ता बॅरिकेड्स लावून पोलिसांनी पूर्णपणे बंद केला होता. रस्त्याच्या एका बाजूला एक खासगी रुग्णालय असल्याने अनेक रुग्णांना रस्त्यापलीकडे थांबावे लागले. त्यातील मधुमेह, रक्तदाब व अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांना सहाय्यक पोलिस निरीक्षक अमरिश देशमुख व अन्य सहकारी पोलिसांनी स्वतः उचलून नेत मदत केली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

Jalna News : पाणी आणण्यासाठी डाव्या कालव्यावर गेलेल्या ऊसतोड मजुराच्या मुलीचा पाण्यात बुडुन मृत्यु; तीन दिवसांनंतर सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT