पिंपरी-चिंचवड

वाकड-ताथवडे-पुनावळेत पाहणी दौरा

CD

वाकड, ता. ६ : येथील विनोदे नगर, ताथवडे आणि पुनावळे परिसरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पोलिस व महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. रस्ते व चौकांतील प्रलंबित कामे, अरुंद आणि दुरवस्था झालेले सेवा मार्ग आणि वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर उपाय काढण्यासाठी गुरुवारी (ता. ६) पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी दौरा करून आढावा घेतला.
विनोदे नगर येथे उभारण्यात आलेल्या इवॉन आयटी मॉलमध्ये लवकरच अनेक नामांकित कंपन्या दाखल होणार आहेत. त्या धर्तीवर हा दौरा झाला. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त सारंग आव्हाड, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, शहरी दळण-वळण विभागाचे सहशहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, उपअभियंता रवींद्र सूर्यवंशी (स्थापत्य ड), चंद्रकांत मोरे, सहायक आयुक्त आदमाने, हिंजवडी वाहतूक विभागाचे राहुल सोनवणे, वाकड वाहतूक विभागाचे बापू ढेरे, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) समन्वयक विनोद पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
कंपन्या सुरु झाल्यास आयटी कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढेल. आधीच ताण आलेल्या वा‍हतूक व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडेल. यामुळे भविष्यातील समस्या टाळण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, यावर चर्चा झाली. सकाळी-संध्याकाळी होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र प्रवेश-निर्गमन मार्ग, वाहन वळणांचे नियोजन आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची गरज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
शनी मंदिर ३० मीटर रस्ता, विनोदे नगर चौक ते अक्षरा शाळा १८ मीटर रस्ता, विनोदे नगर ते आयटी मॉल २४ मीटर रस्ता, वाकड, भूमकर चौक, ताथवडे, पुनावळे परिसरातील सेवा रस्ते इत्यादी रस्त्यांची पाहणी करून प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, चौकांचे सुयोग्य नियोजन, सिग्नल व्यवस्था यांसह काही मार्गावर एकेरी वाहतूक तर काही रस्त्यांवर डायव्हर्जन करता येईल का, अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.

तत्काळ उपाययोजना होणार ?

वाकड-ताथवडे-पुनावळेचा परिसर वेगाने विस्तारत असून, विकासासोबत वाहतूक व्यवस्थेचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. नागरिकांचा वेळ व इंधन वाचवण्यासाठी प्रशासन काय ठोस निर्णय घेणार, आता केवळ पाहणीपुरते न थांबता, वेळेत आणि परिणामकारक अंमलबजावणी होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


भविष्यात वाढणारी वाहनांची वर्दळ त्याबाबत करावयाच्या उपयोजना, प्रलंबित रस्त्यांची कामे याची संयुक्त पाहणी करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी काही रस्त्यांवरील वाहतूक बदल करण्याची मागणी केली आहे. कोंडी टाळण्यासाठी पोलिसांशी समन्वय साधून प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण केली जाणार आहेत.
- बापू गायकवाड, सहशहर अभियंता शहरी दळण-वळण विभाग

फोटो

वाकड : रस्त्यांची पाहणी करून नकाशाद्वारे पडताळणी करताना पोलिस व महापालिका अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी! फायनलमध्ये भारताच्या ४०० धावा पार...

Income Tax Rule : ऑडिटमध्ये उशीर झाला तर थेट 75,000 रुपयांचा दंड! काय आहे नवीन नियम?

Latest Marathi News Live Update : भरधाव इन्होवा कार डिव्हायडरला धडकल्याने अपघात

Pargaon News : टाव्हरेवाडीच्या दोन भावांच्या गोठ्यातील संकरीत कालवडींचा राज्यात गवगवा; विविध कृषि प्रदर्शनात ठरत आहे अव्व्ल

Aircraft Technical Faults India : वर्षभरात किती विमानांमध्ये उद्भवला बिघाड? ; मंत्री मोहोळ यांनी लोकसभेत आकडाच सांगितला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT