हिंजवडी, ता. ७ : कासारसाई येथील माउंट डेल स्कूलच्या प्रांगणात आयोजित ‘माउंट डेल फ्लेअर फेस्टो २०२६’ सांस्कृतिक महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित ‘शिवकल्याण राजा’ या संकल्पनात्मक नाटिकेने उपस्थितांना अक्षरशः स्तब्ध केले.
माउंट डेल स्कूलच्या विश्वस्त श्रुतिका नवले, अ.व.सिंधु विद्याभवन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रा. प्रज्ञा सूर्यवंशी, संस्थेचे सचिव संभाजी बालवडकर, रमेश ससार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची संहिता लेखन व दिग्दर्शन सायली गोडबोले-जोशी यांनी केले. महोत्सवासाठी माउंट डेल स्कूलचे अध्यक्ष अजिंक्य बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माउंट डेल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.