पिंपरी-चिंचवड

वाकड-काळाखडक परिसरात संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

CD

वाकड, ता. २० : वाकड-काळाखडक परिसरातील संत सेवालाल महाराज भक्तमंडळ आणि स्थानिक नागरिकांच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती सोहळ्याचा भक्तिभाव सकारला. होम-हवन व पूजा झाल्यानंतर महाराजांच्या प्रतिमेची पालखी काढण्यात आली. ‘संत सेवालाल महाराज की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत फुगडी व बंजारा नृत्य सादर केले, युवकांनी भजन-कीर्तनातून महाराजांच्या समाजजागृतीच्या विचारांचा जागर केला. संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर शेडगे, उद्योजक संजय जाधव या मान्यवरांचा सन्मान झाला. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अतिष चव्हाण, रामराव सगणे, विष्णू चव्हाण, विजय राठोड, गणेश चव्हाण, पांडुरंग चव्हाण, गोविंद भाने, गोपीनाथ चव्हाण, मारुती राठोड, बाबू राठोड, मोहन राठोड, फकीरचंद राठोड आदींनी नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Stray Dog Attack : थरकाप उडवणारा व्हिडिओ! पुण्यात चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं, पण शेवटच्या क्षणी...

Donald Trump Claim: भारत-पाक युद्ध मीच थांबवलं! ट्रम्प यांचा पुन्हा दावा; २००% टॅरिफची दाखवली भीती अन्...

IND vs SA, T20 WC: भारतीय संघ 'सुपर ८'मध्ये द. आफ्रिकेला चक्रावणारी स्ट्रॅटर्जी वापरणार; सूर्या असं करेल, याचा विचारच कुणी केला नसेल...

Bhiwandi Mayor: भिवंडी पॅटर्न! काँग्रेसच्या खेळीनं भाजप चितपट, नारायण चौधरींचा महापौरपदी दणदणीत विजय

Video: अजित पवारांच्या विमान अपघातावर रितेश देशमुखांची प्रतिक्रिया; रोहित पवारांच्या भूमिकेवर स्पष्टपणे बोलले

SCROLL FOR NEXT