पिंपरी-चिंचवड

सप्तशतीसंगम संमेलन चिंचवडमध्ये उत्साहात

CD

वाकड, ता. २२ : चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर शिक्षण संस्थेत विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्था, प्रांत पश्चिम महाराष्ट्र यांच्यावतीने सप्तशतीसंगम महिला संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या आदर्श मातांचा सन्मान झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उर्मिला अघोर होत्या. निर्मला कुलकर्णी, वर्षा देशपांडे, स्मिता हरहरे, नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. शिवलीला पाटील यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी पायल शिंदे हिने नृत्याविष्कारातून गणेश वंदनेने सुरुवात केली. सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी ‘तू दुर्गा तू चंडी’ हे गीत सादर केले. डॉ. शिवलीला पाटील यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर जबाबदारीची जाणीव असल्याचे स्पष्ट केले. मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, यासाठी नारीशक्तीने पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी मांडले. मुख्याध्यापिका वर्षा जाधव यांनी प्रास्ताविक केले. दीपाली शिंदे यांनी संयोजन केले. श्वेता उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सुलभा लोंढे यांनी आभार मानले. शुभांगी बडवे यांनी सर्वांकडून प्रतिज्ञा म्हणून घेत कार्यक्रमाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs ENG, T20 WC : फिरकीसमोर इंग्लंडची गिरकी! श्रीलंकेची सुपर ८च्या पहिल्याच सामन्यात जबदरस्त कामगिरी

Mumbai-Pune: मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांना टोलचे पैसे परत मिळणार; पण कधी? जाणून घ्या...

संतापजनक! खाजगी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ शिक्षकांचा वर्षभर वारंवार अत्याचार, कुटुंबाला सांगताच...; काय घडलं?

Satej Patil: झिरवळांच्या कार्यालयात ACB ची धाड, फडणवीसांच्या परवानगी शिवाय नाही; अधिवेशनापूर्वी सतेज पाटलांनी उपस्थित केला कळीचा मुद्दा

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! भुरीकवठे-कर्नाटक रस्त्याने दळणवळण सुधारणार; विजयपूरपर्यंत होणार महामार्ग; मंत्री नितीन गडकरींची घाेषणा..

SCROLL FOR NEXT