पिंपरी-चिंचवड

ताथवडेच्या गाडा रस्ता भागात वीज गायब

CD

ताथवडे, ता. २२ : गेल्या दोन-तीन दिवसांपासून ताथवडे गाडा रस्ता परिसरात विजेचा अक्षरशः खेळखंडोबा सुरू असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दिवसातून तब्बल ४ ते ५ तास वीज गायब होत असल्याने घरगुती कामे, व्यावसायिक व्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.
रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत वीज गेल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि नोकरदार वर्ग त्रस्त झाला आहे. घरातील इन्व्हर्टरही वारंवारच्या खंडित पुरवठ्यामुळे निकामी होत आहेत. काही भागांत कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे फ्रीज, पंखे, एसी, संगणक यासारखी उपकरणे नीट कार्यरत राहत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत, नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरूनही आपला संताप व्यक्त केला असून प्रशासनाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

याबाबत योग्य ती माहिती घेऊन तेथील समस्या जाणून तत्काळ उपाययोजना केल्या जातील. नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. मोठे काम निघाले असल्यास तशी पूर्वकल्पनाही दिली जाते.
- वैभव देशमुख, सहाय्यक अभियंता, महावितरण, ताथवडे विभाग

ताथवडे गाडा रस्ता परिसरात दोन-तीन दिवस अचानक खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. देखभाल दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे महावितरणकडून सांगितले जाते; मात्र या कामाबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. परिणामी, सोसायट्यांतील दैनंदिन कामकाज पाणीपुरवठा, लिफ्ट सेवा विस्कळीत झाली. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची गैरसोय झाली. देखभाल दुरुस्तीबाबत आगाऊ सूचना दिल्यास सोसायट्यांना योग्य नियोजन करता येईल आणि अनावश्यक त्रास टाळता येईल.
- अवनीश माने, अध्यक्ष, द नूक सोसायटी, ताथवडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Group 2 Standing: इंग्लंडच्या विजयाने सुपर ८ च्या गटात मोठा उलटफेर; श्रीलंकेसह पाकिस्तानचंही वाढलं टेंशन; जाणून घ्या उपांत्य फेरीचं समीकरण

Missing Link project: मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सुरू होताच टोल दरात बदल होणार का? नवीन नियम काय? महत्त्वाची माहिती आली समोर

T20 WC, IND vs SA: अक्षर पटेलला संधी नाहीच; दक्षिण आफ्रिका संघात तब्बल ४ बदल; Super-8 सामन्यासाठी पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

Pune News: वाहनांची तपासणी आता अवघ्या सहा मिनिटांत;‘आरटीओ’चे स्वयंचलित चाचणी केंद्र एक मार्चपासून सेवेत, वेळेची हाेणार बचत!

Dive Ghat Pune Traffic Update: दिवेघाटात उद्या दोन तास वाहतूक बंद; आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील रुंदीकरणासाठी निर्णय!

SCROLL FOR NEXT