पिंपरी-चिंचवड

थेरगावातील हिंदू संमेलनात सामाजिक समरसतेवर भर

CD

वाकड, ता. ११ : थेरगाव येथील बारणे वस्ती परिसरातील स्विस काउंटी सहकारी गृहरचना संस्थेमधील कामेश्वर मंदिरात हिंदू संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हिंदू समाजातील समरसता, संघटन व सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देत संमेलनात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. जयंत बाहेती होते. प्रमुख वक्ते समीर कुलकर्णी, गायत्री परिवार वाघोली केंद्राचे प्रेम सारस्वतजी, गायत्री परिवार हरिद्वारचे सूरज सिंग, अमृत महाराज यांच्यासह स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, नगरसेवक तानाजी बारणे, कैलास बारणे, नगरसेविका योगिता बारणे, मनीषा पवार आदी उपस्थित होते. सूरज सिंह महाराज यांनी सनातन धर्मातील पर्यावरणपूरक परंपरा जसे वृक्षपूजन, भूमीपूजन यांचा पर्यावरण संवर्धनाशी असलेला संबंध स्पष्ट केला. तर कुलकर्णी यांनी ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट करत सामाजिक समरसतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी गायत्री परिवाराच्यावतीने भजनसेवा झाली. अनुराधा कर्डिले यांनी मातृशक्तीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला. विवेक सोनार यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत डाहाळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

SCROLL FOR NEXT