पिंपरी-चिंचवड

डांगे चौक परिसरातील वीज पुरवठा रात्रभर खंडित

CD

वाकड, ता. १२ : थेरगाव, गुजरनगर येथील धाईंजे शाळेजवळील महावितरणच्या रोहित्राला मंगळवारी (ता. १०) सायंकाळी सातच्या सुमारास कचऱ्यामुळे आग लागली. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आल्याने नागरिकांना रात्रभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
या रोहित्राभोवती आजूबाजूच्या परिसरातील नागरिक कचरा टाकतात. या कचऱ्यामुळेच ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग लागताच थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी तत्काळ याबाबत अग्निशामक दलाला वर्दी दिली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारी व तांत्रिक पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रोहित्राला लागलेली आग आटोक्यात आणून नुकसानग्रस्त उपकरणांची पाहणी केली. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. अनेक गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने तसेच लहान व्यावसायिक आस्थापनांमध्ये अंधार पसरला. रोहित्रातील काही महत्त्वाचे भाग जळाल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरू करण्यास विलंब झाला. डांगे चौकातील गायत्री लँडमार्क फेज-१ व २, सिग्नेचर पार्क, भोईर इस्टेट आदी भागांमध्ये मध्यरात्री दोन वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहिला.

सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही वीजपुरवठा खंडित केला होता. वीज पुरवठा करणाऱ्या सर्व वाहिन्या देखील जळाल्या होत्या. रोहित्राचे काम पूर्ण होताच टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
- वैभव देशमुख, सहाय्यक अभियंता, थेरगाव-ताथवडे महावितरण विभाग

रोहित्राभोवती वारंवार नागरिक लपून-छपून कचरा टाकतात. त्यामुळे महावितरणने देखील रोहित्राभोवती मोठ्या जाळ्या उभ्या कराव्यात व अन्य उपाय योजना कराव्यात.
- अनिकेत प्रभु, अध्यक्ष, थेरगाव सोशल फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT