पिंपरी-चिंचवड

वाहतूक कोंडी, अपघात, प्रदूषणाबाबत नागरिकांचे गाऱ्हाणे

CD

वाकड, ता. १५ : अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वाढलेले अपघात, मालवाहू वाहनांतून पडणारा राडारोडा, धोकादायक झालेले रस्ते, त्याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष, ‘आरएमसी’ प्लांट चालकांची मनमानी, धुळीचे वाढते प्रदूषण, पाण्याची समस्या, भुयारी मार्गांतील कोंडी याकडे विविध हाउसिंग सोसायट्या, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व नागरिकांनी लक्ष वेधत गाऱ्हाणे मांडले. तसेच उपाय-योजनांवर चर्चा करण्यात आली.
पुनावळे येथील ७ प्लमेरिया ड्राईव्ह सोसायटीत ‘धुळमुक्त पिंपरी चिंचवड शहर’ या जनजागृती अभियानाला रविवारी (ता.१५) सुरुवात झाली. अभियानाच्या नियोजनाबाबत महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक पार पडली.
त्यावेळी ही गाऱ्हाणी मांडण्यात आली. सहशहर अभियंता सुनील भागवानी, कार्यकारी अभियंता सोहम निकम, योगेश आल्हाट, सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, शांताराम माने, ७ प्लमेरिया ड्राईव्ह सोसायटीचे अध्यक्ष गणेश भामे, श्रीकांत झापटे, शलाका बोडांवार, गजानन सूर्यवंशी, गणेश पायाळ यांच्यासह इन्फिनिटी वर्ल्ड, इन्फिनिटी टॉवर, सायप्रस, साई पॅराडाईज, सारा मेट्रो व्हिले, रोशन माईल्ड स्टोन, पुणे व्हिले, जीके मीराई, राहुल डाऊन-टाऊन आदी सोसायट्यांचे पदाधिकारी व रहिवासी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले,‘‘‘पिंपरी चिंचवड शहर धुळमुक्त करण्यासाठी नागरिकांचाही सक्रिय सहभाग आवश्यक असून सर्वांनी पुढाकार घेत प्रशासनास सहकार्य करावे. याबाबत प्रशासनाला देखील प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण व पायाभूत सुविधांबाबतीत नागरिक व लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या कामचुकार महापालिका अधिकाऱ्यांवर बदली अथवा निलंबनाची कारवाई केली जाईल.’’
विविध सामाजिक संघटनांच्या सूचना व मतेही बैठकीत जाणून घेण्यात आली. वाढती बांधकामे, रस्त्यांवरील धुळीमुळे होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांवर चर्चा झाली. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी नियमित पाणी फवारणी, रस्त्यांची स्वच्छता, बांधकामस्थळी व अवजड वाहनांबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT